Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १८ एप्रिल, २०२६

ग्रामसभा मोबिलायझर्य पदसंख्या कमी न करण्याची मागणी .



बापू चव्हाण दिंडोरी :-

  ग्रामसभा मोबिलायझर्स पदसंख्या कमी करु नये,या मागणीसाठी पेसा मोबिलायझर्सच्या वतीने गटविकास अधिकारी,नायब तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. 
        निवेदनात म्हटले आहे की, ग्रामसभा मोबिलायझर्स पदसंख्या सन २०२५ -२०२६ मधील ३००३ वरून सन २०२६-२०२७ साठी १००१ इतकी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.सदर निर्णयामुळे अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभांच्या कामकाजावर गंभीर परिणाम होणार असून,ग्रामसभा सक्षम व प्रभावीपणे चालविण्यास अडथळे निर्माण होणार आहेत. ग्रामसभा मोबिलायझर्स है गावपातळीवर पेसा काय्द्याची अंमलबजावणी,जनजागृती व समन्वय साधणारे महत्त्वाचे घटक आहेत.त्यामुळे आमच्या पदसंख्येत कपात करणे हे ग्रामसभांच्या सबलीकरणाच्या विरोधात आहे. भारताच्या संविधानातील पाचवी अनुसूची व पेसा कायदा,१९९६ नुसार अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभांना बळकट करणे आवश्यक आहे.अशा परिस्थितीत मोबिलायझर्सची संख्या कमी करणे हे या कायद्यांच्या उद्देशांना बाधा आणणारे आहे.याशिवाय सध्या कार्यरत मोबिलायझर्सना अत्यल्प मानधनावर काम करून घेतले जात आहे.त्यामुळे रोजगारावर परिणाम करणारा हा निर्णय अन्यायकारक आहे.ग्रामसभा मोबिलायझर्स पदसंख्या कमी करण्याचा निर्णय तात्काळ स्थगित करण्यात यावा, सदर पदसंख्या पूर्ववत (३००३) कायम ठेवण्यात यावी,ग्रामसभांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक मोबिलायझर्स कायम ठेवण्यात यावे,कार्यरत मोबिलायझर्सच्या रोजगाराचे संरक्षण करण्यात यावे,ग्रामसभा व पेसा काय्द्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मोबिलायझर्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे सदर निर्णयाचा पुनर्विचार करून योग्य तो निर्णय घेण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. 
      यावेळी दिंडोरी नगरपंचायतीच्या नगरसेविका शैलाताई उफाडे,माजी पंचायत समिती सदस्या संगीता घिसाडे,अंबानेरेचे सरपंच संतोष रेहरे यांनी आपल्या मनोगतांतून ग्रामसभा मोबिलायझर्स पदसंख्या कमी न करण्याची मागणी केंद्र व राज्य शासनाकडे केली.यावेळी गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे व नायब तहसिलदार वसंत ढोमसे यांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी पद्मा वाघेरे,अनिता राऊत,शैला धुळे, चांगुणा हिंडे,शितल लिलके,जिजा शिंदे,हिरा चौधरी,पुष्पा गांगोडे, मनीषा दळवी,रुपाली मोरे,निर्मला जाधव,विजया बगर,सारीका गवे, सरला निंबाळकर,हेमलता दोडके, सुवर्णा जाधव,स्वाती शिंदे,विजया गवळी,वंदना गांगोडे,शितल बोंबले, रेखा मिसाळ,अनिता नेहरे,ज्योती गोतरणे,शंकुतला कराटे,रंजना कडाळे आदींसह तालुक्यातील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध