Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १८ एप्रिल, २०२६
लवांडेंच्या वक्तव्यांचा वारकरी सांप्रदायाकडून निषेध.
बापू चव्हाण दिंडोरी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विलास लवांडे यांनी वारकरी सांप्रदायातील नामवंत किर्तनकारांबाबत जे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वारकरी सांप्रदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे शुक्रवार दिनांक १७ एप्रिल रोजी दिंडोरी तालुक्यातील वारकऱ्यांनी एकत्र येऊन लवांडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
यावेळी तालुक्यातील वारकऱ्यांनी दिंडोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयापासून टाळ मृदंगाचा गजर करत वारकरी परंपरेचे अभंग गाऊन भर उन्हात दिंडोरी तहसिल कार्यालयापर्यंत रॅली काढली. यावेळी वारकरी सांप्रदायाच्यावतीने नायब तहसिलदार चैताली दराडे, व दिंडोरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देवून विलास लवांडे यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.
याप्रसंगी दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती योगेश बर्डे, वारकरी सांप्रदायाचे तालुकाध्यक्ष पांडूरंग गडकरी, दिलीप जाधव सामाजिक कार्यकर्ते बापू (तात्या) चव्हाण दत्तू भेरे, आण्णा महाराज चव्हाण,पांडूरंग पाटील, प्रल्हाद आव्हाड,मधुकर उफाडे, बाळासाहेब पाटील,पद्माकर जगताप,काशिनाथ शिंदे,शरद देशमुख,संजय जाधव, संदीप संधान,निवृत्ती संधान,सुख्देव ठाकरे, जयराम नाठे,ज्ञानेश्वर नवले,सुनील पाटील,भाऊसाहेब पाटील,अंबादास पाटील,भास्कर वसाळ,तुषार पाटील, नामदेव मुरकूटे,संतोष आंबेकर, पंढरीनाथ पवार,मल्हारी बोडके आदींसह दिंडोरी तालुक्यातील वारकरी सांपद्रायाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा