Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २० एप्रिल, २०२६

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा, डॉ. शिंदे छत्रपती शिवाजी महाराज अभियान समाधान शिबिरा'त ४७५ दाखल्यांचे वाटप.



बापू चव्हाण दिंडोरी

     शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, हाच या समाधान शिबिराचा मुख्य उद्देश असून नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.असे प्रतिपादन उपविभागीय प्रांत अधिकारी डॉ.आप्पासाहेब शिंदे यांनी केले .
        छत्रपती शिवाजी महाराज अभियान समाधान शिबिर लखमापूर मंडळच्यावतीने अवनखेड येथील वै. स्वामी पद्मानंद सरस्वती महाराज सभागृहात भव्य समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी दिंडोरी उपविभागीय अधिकारी डॉ.आप्पासाहेब शिंदे बोलत होते.
           शासकीय योजना आणि दाखले थेट जनतेच्या दारी पोहोचवण्याच्या या उपक्रमाला ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला असून,एकाच दिवशी तब्बल ४७५ विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.या विशेष कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपविभागीय अधिकारी डॉ.आप्पासाहेब शिंदे यांनी भूषवले.कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार चैत्राली दराडे,पुरवठा विभाग नायब तहसीलदार अक्षय लोहारकर,सरपंच नरेंद्र जाधव, लखमापूर सरपंच संगीता दळवी,परमोरीच्या सरपंच वंदना जाधव आणि करंजवणचे उपसरपंच रंगनाथ बर्डे,कादवा सहकारी साखर कारखाना संचालक निंबा देशमुख,ग्रामपंचायत अधिकारी सुभाष कर्डक आदी उपस्थित होते.
    ​ ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत,यासाठी आयोजित या शिबिरात महसूल विभाग आणि इतर विभागांच्या वतीने दाखल्यांचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी विविध विभागांचे शासकीय कर्मचारी,ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर, ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील, मुख्याध्यापक,सेतू संचालक तसेच प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    ​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार वाघ यांनी केले.तर शिबिर यशस्वीतेसाठी लखमापूरचे मंडळ अधिकारी मोहन गायकवाड, ग्राम महसूल अधिकारी महेश भोये, प्रितेश वरसाळे,वैशाली पवार,राजश्री पाळदे व कमलेश पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध