Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २१ एप्रिल, २०२६
पालखेड बंधारा येथे अखंड हरिनाम सप्ताह शताब्दी निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.
बापू चव्हाण दिंडोरी
दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे अखंड हरिनाम सप्ताह शताब्दी निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
वारकरी सांप्रदाय परंपरेनुसार या अखंड हरिनाम सप्ताहाची शताब्दी पूर्ण होत असल्याने तालुक्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ प्रवचनकार,कीर्तनकार, गायक,वादक,आध्यात्मिक, सामाजिक,शैक्षणिक,तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते.
प्रथमता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर पुरोहित यांच्या मंत्र पठणाने या ध्वजाचे ध्वजारोहण श्री संत जनार्दन स्वामी महाराज यांचे शिष्य परमेश्वर महाराज,वृद्धेश्वर महाराज, ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज घुमरे, तसेच गावातील ज्येष्ठ वारकऱ्यांच्या हस्ते करण्यात करून मान्यवरांच्या हस्ते पाद्यपूजनाचा कार्यक्रम पार पडला.त्यानंतर लोकवर्गणीचे श्रीफळ फोडण्यात आले.यावेळी परमपूज्य परमेश्वर महाराज,पांडुरंग शास्त्री उखर्डे,प्रल्हाद महाराज आव्हाड यांनी शताब्दी उत्साहानिमित्ताने आपले मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले. प्रास्ताविकामध्ये काका गायकवाड यांनी येऊ घातलेल्या या अखंड हरिनाम सप्ताह शताब्दी निमित्ताने कार्यक्रमाच्या आयोजनाची व रुपरेषा यामध्ये शिवपुराण तसेच महाराष्ट्रातील कोण कोणत्या नामवंत कीर्तनकारांची हरीकीर्तने होणार व गायक वादक याबाबत माहिती दिली.सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते बापू (तात्या) चव्हाण यांनी केले.तर आभार बी.के.गायकवाड यांनी मानले.कार्यक्रमाला तालुक्यातील व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
महेंद्र लोढा :- *सोशल मीडियावर मारवाडी जैन समाजाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट तयार करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या सागर मोर याच्यावर गुन्ह...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा (कॉलनी) येथे आज दि.१८ एप्रिल रोजी येथील शेतकरी वैभव गायकवाड यांच्या राहत्या घर...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा