Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २० एप्रिल, २०२६
दिंडोरी तालुका वारकरी सांप्रदायाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप महाराज संधान यांची निवड.
बापू चव्हाण दिंडोरी
दिंडोरी तालुक्यातील कुर्णोली येथील भुमीपुत्र व समाज कार्यात अग्रेसर असणारे तरुण निष्ठावंत वारकरी ह.भ.प. संदिप महाराज संधान यांची दिंडोरी तालुक्याचे अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
राष्ट्रीय अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर व राष्ट्रीय सचिव तथा जिल्हा सचिव पुंडलिक महाराज थेटे, प्रदेशाध्यक्ष भरत महाराज वाघ शिवडा प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग महाराज गडकरी शिवनई,जिल्हा सेवा समितीचे अध्यक्ष आबासाहेब महाराज गाडे अक्राळे यांनी ही निवड जाहीर केली आहे.
संदिप महाराज संधान यांचे निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले आहे.मंगळवार दि.२१ एप्रिल स.११.३० वा रामकृष्ण महाराज लहवितकर यांचे शुभहस्ते व पुंडलिक महाराज थेटे,आण्णासाहेब महाराज आहेर,भरत महाराज वाघ,पांडुरंग महाराज गडकरी दिनकर महाराज खांडबहाले,निवृत्ती महाराज कापसे,सतिश महाराज अलई,हिरामण महाराज म्हैसधुने,आबासाहेब महाराज गाडे,शामराव महाराज गायकर विठ्ठल महाराज संधान यांचे प्रमुख उपस्थितीत वारकरी भवन विजयनगर सिन्नर येथे जाहीर सत्कार होणार आहे अशी माहीती प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष ह.भ.प.निवृत्ती महाराज कापसे यांनी दिली आहे.
संदीप महाराज संधान यांच्या निवडीचे दिलीप जाधव,बाळासाहेब पाटील,सामाजिक कार्यकर्ते बापु (तात्या) चव्हाण,दत्तु मोरे,अण्णा महाराज चव्हाण,प्रल्हाद महाराज आव्हाड,मधुकर उफाडे,पद्माकर जगताप,काशिनाथ शिंदे शरद देशमुख,संजय जाधव,निवृत्ती संधान,विठ्ठल संधान,सुकदेव ठाकरे, जयराम नाठे,ज्ञानेश्वर नवले सनिल पाटील भाऊसाहेब पाटील,अंबादास पाटील,भास्कर वसाळ,तुषार पाटील नामदेव मुरकुटे,संतोष आंबेकर, पंढरीनाथ पवार,मल्हारी बोडके यांनी स्वागत केले आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा