Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २० एप्रिल, २०२६
जानोरीत मंगळवारपासून पारंपरिक बोहडा उत्सव तरुण युवकांचे यात्रेला मोठया प्रमाणात पुढाकार.
बापू चव्हाण दिंडोरी
दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे मंगळवारपासून ऐतिहासिक व पारंपारिक बोहडा उत्सवाला मंगळवार दि.२१ एप्रिल रोजी सुरुवात होणार असून,ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभलेल्या जानोरी गावात ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले अनेक मंदिरे आहेत,त्यापैकी सर्वात जुनी पार्श्वभूमी व महत्त्वाचे गावचे ग्रामदैवत म्हणजे जगदंबा माता असून जगदंबा मातेस ग्रामदेवता म्हणून संबोधले जाते. गावात मोठे जगदंबा मातेचे मंदिर आहे.
या बोहाड्याची कथा अशी आहे कि गावात एकनाथ व सोमनाथ हे गृहस्थ राहात होते,त्यांना जगदंबा देवीचा साक्षात्कार झालेला होता, या दोघांनी मंदिराची स्थापना केली होती,त्यांनीच सुरू केलेला बोहाडा उत्सव आजही कायम आहे,दिंडोरी तालुक्यातील जानोरी या गावास ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेले असल्यामुळे येथे अनेक ऊत्सव साजरे करण्यात येतात, त्यापैकी सर्वात जुना इतिहास असलेला व महत्त्वाचा उत्सव म्हणजे बोहाडा,शेकडो वर्षाची परंपरा लाभलेल्या या उत्सवाची दंतकथा वयोवृद्ध सांगतात,गावात शिंपी समाजाचे एकनाथ व सोमनाथ हे गृहस्थ होते,या दोघांनाही बाहेरगावी ये-जा करावी लागत असे, एकदा दोघांनाही वणीकडे जात असताना पायवाटेच्या कडेला झाडाझुडपांमध्ये लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला,त्यांनी शोध घेतल्यावर त्यांना एका लहानशा पेटीत मुलगी दिसली,आजुबाजुला कोणीही न दिसल्यामुळे तिला ते स्वतःघरी घेऊन आले,तिचे पालनपोषण करण्यास सुरुवात केली,काही वर्षांनी जेव्हा ती उपवर झाली तेव्हा एकनाथ व सोमनाथ यांना तिच्या विवाहाची चिंता वाटु लागली.त्यांनी विवाहाचा विषय तिच्यापुढे मांडला तेव्हा तिने, माझा विवाह करणारे तुम्ही कोण आहात?असा उलट प्रश्न केला व तिथेच अंतर्धान पावली,काही दिवसांनी तिने एकनाथ व सोमनाथ यांना दृष्ठांतात तिने या उत्सवाची आज्ञा दिली, आज्ञेप्रमाने या उत्सवास सुरूवात झाली,या सुरूवातीत गोंधळी-भराडी येवुन गोंधळ केल्यावर पहिल्या रात्री गणपती व विचारी सोंगे नाचवली जाउन पहिल्या दिवशीचा उत्सव समाप्त होतो दुसर्या दिवशी रात्री गणपती व नाच्या यांची मिरवणूक काढली जाते,सनई चौघड्यांच्या नादात, तुतारीच्या निनादात,मशालीच्या उजेडात व गावकर्यांच्या जल्लोषात ही सोंगे नाचत असतात,प्रत्येक सोंग कमीत कमी अर्धा तास तरी नाचवली जातात.प्रत्येक दिवशीची सुरूवात गणपती व नाच्या यांच्या लढाईने सुरू केली जाते,नंतर मत्स्य व शंकासुर यांची लढाई असते,तसेच खंडेराव व मलमल्य यांचे युद्ध व भैरवनाथाची मिरवणूक काढली जाते. तसेच सारजा - वेताळ, वाघ - एकादशी, दक्षराजा -वीरभद्र, नरसिंह - हिरण्यकश्यपु इत्यादी जोडप्यांचे युद्ध खेळवले जातात,शेवटच्या दिवशी म्हणजेच आता दुसऱ्या दिवशी रात्री सारजा-वेताळ,रावण - बकासुर, वराह - हिरण्यकश्यपु, कच्छ-राणा अशा विविध जोडप्यांचे एकामागोमाग एक युद्ध खेळवली जातात. व उत्सवाचा शेवट जगदंबा माता - म्हैशासुर, जगदंबा माता - लोंढ्याच्या लढाईने होते.ही लढाई सर्वात महत्वाची मानली जाते. दुरवरून लोक ही लढाई बघण्यासाठी येतात.हा बोहाडा उत्सव फक्त नाशिक जिल्ह्य़ातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रख्यात आहे, लढाई संपल्यावर गावात जगदंबा मातेची मिरवणूक काढण्यात येते.सायंकाळी कुस्त्यांची दंगल आयोजित केली जाते,अशा या ऐतिहासिक बोहाडा उत्सवावेळी महाराष्ट्रातुन भाविक दर्शनासाठी गर्दी करतात,कुणी आपले मनोकामना पूर्ण करण्यासाठी नवस बोलतात तर कुणी मनोकामना पूर्ण झाली म्हणून नवस फेडतात. नवसाला पावणारी जगदंबा म्हणुनही ओळख जगदंबा मातेची आहे. नवराञात जगदंबामातेच्या मंदिरात होमहवन केला जातो,दिवसेंदिवस जगदंबा मातेच्या भक्तगणांत वाढ होवून असंख्य भाविक जगदंबा मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळू लागते.याञेनिमित्त येणाऱ्या भाविकांची गर्दी इतकी वाढते की मंदिरात प्रवेश घेणेही मोठे जिकिरीचे होते.भाविकांची दर्शनासाठी दिवसेंदिवस संख्या वाढत आहे
जगदंबा मातेच्या उत्सवामध्ये महाराष्ट्रातुनच नाही तर परराज्यातीलही भाविक याञेनिमित्त हजेरी लावतात.इतर वेळीही वर्षभर भाविकांची वर्दळ ही चालुच असते.या बोहडा उत्सवाला भाविकांनी मोठया संख्येनं उपस्थित राहण्याचे आव्हान यात्रेच्या पंच मंडळी तसेच यात्रा कमेटीच्या वतीने केले आहे.
चौकट
यात्रा उत्सव रूपरेषा मंगळवार दि.२१ एप्रिल वाजंत्री दोन्ही मंदिर व समाधी हजेरी १-घटस्थापना गणपती २-शिंपीबारभाई लढाई ३-काठे लढाई ४-शंखासूर मछ्छ
५-खंडेराव मलमल्या लढाई
६-वाघ लढाई ७-तिडके लढाई ८-भैरवनाथ लढाई
बुधवार दि.२२ एप्रिल
१-गणपती २- सारजा ३-शिंपी बारभाई वेताळ ४-वाघ एकादशी
५-वाल्मीक आखाडा ६-विरभद्र राजा लढाई ७-हिरण्यकश्यप नरसिंह लढाई गुरुवार २३ एप्रिल
१-गणपती २-सारजा ३-डुक्कर
४-अठराभाई वेताळ ५- वराह
६-हेडंबा मलमल्य ७-कछ्छ लढाई
८- वाघ एकादशी ९-जरासंध
१०-फिरता घोडा ११-वाल्मिक आखडा शुक्रवार दि.२४ एप्रिल सकाळी ७:३० ते १० वाजेपर्यंत देवीची मिरवणूक म्हैशासुर लोंढ्या याची लढाई छ.शिवाजी चौकात/ वेशीच्या चौकात होणार आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा