Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ४ एप्रिल, २०२६

जाहीर आवाहन शिरपूर शहरातील सर्व वसतिगृह चालक आणि घरमालकांनो,



शिरपूर शहरात व्यावसायिक आणि उच्च शिक्षणासाठी राहणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. काही दिवसांपासून आपल्या वसतिगृहातील तसेच भाडेतत्वावर खोली घेऊन राहणारे विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ करीत असून सामाजिक उपद्रव माजवत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. आपण आपल्या व विद्यार्थ्यांच्या हितासाठी पुढील सूचनांचे पालन करावे. 

१. सर्व वसतिगृहे आणि घरमालकांनी त्यांच्याकडे राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा मूळ रहिवास पत्ता, छायाचित्र, आधार कार्डची झेरॉक्स स्वतःजवळ बाळगावी.

२.आपल्याकडे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना रात्री नऊपर्यंत खोलीत परतण्याची वेळ निश्चित करावी. या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करावी. 
 
३.रात्री निर्धारित वेळेत सर्व विद्यार्थी वसतिगृहात/खोलीत हजर असल्याची खात्री करावी. त्यासाठी हजेरी नोंदणी पुस्तक (Attendance Register) ठेवावे व ते अद्ययावत राखावे.

४.विद्यार्थ्यांना सार्वजनिक ठिकाणी गोंधळ न घालण्याची आणि शिस्त पाळण्याची सूचना द्यावी.

५.नियमबाह्य आणि उपद्रवी वर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत त्यांच्या पालकांना तातडीने सूचित करावे. अशा सूचनांचे रेकॉर्ड ठेवावे.

६.वसतिगृहाच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून विद्यार्थ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे. विद्यार्थ्यांबाबत काही समस्या निर्माण झाल्यास पोलिसांना माहिती द्या. आपल्याला संपूर्ण सहकार्य केले जाईल.

कृपया लक्षात घ्या, वसतिगृहातील विद्यार्थी रात्री/अपरात्री गोंधळ माजवताना, गैरवर्तन करताना आढळले, तर अशा विद्यार्थ्यांसोबत वसतिगृह चालक आणि घरमालक यांनाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे व संभाव्य कारवाईचा कटू प्रसंग टाळावा. शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.

-पोलीस निरीक्षक,
शिरपूर शहर पोलीस स्टेशन, शिरपूर जि.धुळे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध