Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ४ एप्रिल, २०२६
पिंपळगाव बसवंत येथे भव्य सत्संग व पालखी सोहळा संपन्न.
बापू चव्हाण नाशिक
निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगतगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांचे उत्तराधिकारी,अनंत श्री विभूषित जगतगुरू शांतीगिरीजी महाराज यांच्या पावन उपस्थितीत श्री जनेश्वर महादेव मंदिराचा १२ वा वर्धापन दिनप्रसंगी भव्य सत्संग सोहळा मोठ्या थाटात साजरा झाला.या मंगलमयी प्रसंगी पिंपळगाव नगरीत भव्य श्री बाबाजींची पालखी मिरवणूक संपन्न झाली.
ढोल-ताशांच्या गजरात आणि 'जय बाबाजी'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेली भव्य पालखी आणि भाविकांचा उत्साह पाहायला मिळाला.प.पू. महात्माजींनी प्रवचनातून उपस्थितांना मार्गदर्शन करत जीवनाचे सार्थक्य कसे करावे,याचे अनमोल विचार मांडले.
या सोहळ्याला निफाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीपराव बनकर,पिंपळगाव बसवंतचे नगराध्यक्ष डॉ.मनोज बर्डे, आश्रमीय संत आणि विविध मान्यवरांनी उपस्थित राहून बाबाजींचे दर्शन घेतले.परिसरातील हजारो भाविकांनी या सत्संग सोहळ्याचा लाभ घेतला.धार्मिक परंपरेचा वारसा जपणारा आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवणारा हा सोहळा पिंपळगाव बसवंतच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला आहे. जय बाबाजी भक्त परिवार व ग्रामस्थांनी सुंदर असे नियोजन केले होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा