Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २२ एप्रिल, २०२६
Home
/
Unlabelled
/
वेळेच्या काटेकोरपणाचा आदर्श! कल्याण येथे विपुल-स्नेहल यांचा शुभविवाह ठरलेल्या मुहूर्तावर संपन्न
वेळेच्या काटेकोरपणाचा आदर्श! कल्याण येथे विपुल-स्नेहल यांचा शुभविवाह ठरलेल्या मुहूर्तावर संपन्न
कल्याण (प्रतिनिधी) – दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी सौं. संगीता राजू नामदेव फुलपगारे (मूळ गाव धुळे, सध्या मुक्काम कल्याण) यांच्या चिरंजीव चि. विपुल यांचा स्नेहल यांच्यासोबतचा शुभविवाह कल्याण येथे अगदी ठरलेल्या मुहूर्तावर, सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी यशस्वीरीत्या पार पडला.
लग्नसोहळा वेळेवर आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडल्याबद्दल वधू-वरांच्या कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. यानिमित्ताने सौं. संगीता फुलपगारे, श्री. राजू फुलपगारे तसेच त्यांचे बंधू श्री. भाईदास फुलपगारे यांचा शिरपूर तालुका भोई समाज आणि धुळे जिल्हा भोई समाज सेवा संस्था यांच्या वतीने शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी धुळे जिल्हा भोई समाज सेवा संस्थेचे जिल्हाध्यक्ष भाईदास मोरे, मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्हाध्यक्ष अनिल वाडिले, समाजाचे नायब तहसीलदार प्रशांत ढोले, शहराध्यक्ष जगदीश मोरे, मध्य प्रदेशातील शेदवा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वाडीले, दोंडाईचा येथील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम दला वाडिले, कल्याण येथील युवराज बोरसे तसेच धुळे येथील विविध सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वेळेचे महत्त्व अधोरेखित करत, अशा वेळेवर पार पडणाऱ्या विवाह सोहळ्यांमधून समाजाने आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. भोई समाजानेही पुढील काळात सर्व विवाह सोहळे वेळेत पार पडावेत यासाठी प्रयत्न करावेत, असा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
महेंद्र लोढा :- *सोशल मीडियावर मारवाडी जैन समाजाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट तयार करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या सागर मोर याच्यावर गुन्ह...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा (कॉलनी) येथे आज दि.१८ एप्रिल रोजी येथील शेतकरी वैभव गायकवाड यांच्या राहत्या घर...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा