Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १७ एप्रिल, २०२६
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वकृत्व स्पर्धा
भारतीय घटनेचे शिल्पकार, शोषित-वंचितांचे मुक्तिदाते, स्त्री उद्धारक विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तालुक्यातील वाडी बु येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मानवंदना व अभिवादन करण्यात आले , प्रसंगी जनहित युथ फाउंडेशन वाडी या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून इयत्ता ३ री व चौथी च्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण १२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यात प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थ्यांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले .
दि १४ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता वाडी बु येथील जिल्हा परिषद मराठी शाळा या ठिकाणी गावातील मान्यवर , शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक,शिक्षिका तसेच समाज बांधव यांच्या उपस्थितीत शिरपूर साखर कारखाना चेअरमन माधवराव पाटील यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी माजी सरपंच दरबारसिंग राजपूत ,सूतगिरणी संचालक नामदेव श्रावण चौधरी ,शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक शरद सूर्यवंशी ,मच्छिन्द्र गुजर ,जितेंद्र पाटील ,सुभाष राजपूत ,आनंदा राजपूत ,संजय महाले ,डी के थोरात ,शहाणा पवार ,गोपाल जी,राहुल बैसाणे ,दिनेश तिरमले , ग्रामस्थ व समाजबांधव , तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ,
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जनहित युथ फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत एकूण १२ विद्यार्थिनी सहभाग घेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपट तसेच त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली.या स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वराज शरद थोरात इयत्ता ४ थी याने पटकावला तर अनुष्का अविनाश जोगी द्वितीय,देवयानी मनोज सुर्यवंशी हिने तृतीय क्रमांक पटकवला,यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरंच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. परीक्षक म्हणुन डॉ रवी बैसाणे यांनी काम पाहिले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संस्थेचे अध्यक्ष अँड ज्ञानेश्वर थोरात यांनी केले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा