Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ एप्रिल, २०२६
Home
/
/
जांबुटके (ता. दिंडोरी) ग्रामपंचायत अधिकारी निलंबित फेसबुकवरील व्हायरल व्हिडिओ, वक्तव्य व आर्थिक व्यवहाराच्या आरोपांवर कारवाई.
जांबुटके (ता. दिंडोरी) ग्रामपंचायत अधिकारी निलंबित फेसबुकवरील व्हायरल व्हिडिओ, वक्तव्य व आर्थिक व्यवहाराच्या आरोपांवर कारवाई.
संदीप अवधूत :-
नाशिक (प्रतिनिधी) – दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथील ग्रामपंचायत अधिकारी रविंद्र निवृत्ती चौधरी यांना शासकीय सेवेत शिस्तभंग, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह वक्तव्य तसेच आर्थिक व्यवहाराच्या आरोपांवरून जिल्हा परिषद नाशिकने निलंबित केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी १६ एप्रिल २०२६ रोजी हा आदेश जारी केला.
आदेशानुसार, फेसबुकवर व्हायरल झालेल्या व्हिडिओत संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासन, सरपंच व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांबाबत आक्षेपार्ह व अनुचित वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. या व्हिडिओमुळे प्रशासनाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तसेच, ग्रामपंचायत स्तरावरील कामकाज करताना काही प्रकरणांमध्ये आर्थिक व्यवहार व पैशांच्या वाटाघाटी झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या सर्व बाबींची गंभीर दखल घेत प्राथमिक चौकशीत प्रथमदर्शनी आरोपांमध्ये तथ्य आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ व महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्यांचे वर्तन हे शासकीय सेवकाला अपेक्षित शिस्त व आचारसंहितेच्या विरोधात असल्याचे आदेशात नमूद आहे.
तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही शासकीय कामकाजात हस्तक्षेप करू नये, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, दिंडोरी तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या काही संघटनांमुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याने तालुक्यात या निर्णयाचे स्वागत होत असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही काळापासून संघटनात्मक हस्तक्षेपामुळे प्रशासनातील वातावरण गढूळ झाल्याची चर्चा असून, या कारवाईमुळे शिस्त प्रस्थापित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा