Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १८ एप्रिल, २०२६
Home
/
/
🚨 “शेतकऱ्यांचा आक्रोश; ‘शिरपूर फर्स्ट’चा इशारा – वाढीव नुकसान भरपाई द्या, अन्यथा ठिय्या आंदोलन!”
🚨 “शेतकऱ्यांचा आक्रोश; ‘शिरपूर फर्स्ट’चा इशारा – वाढीव नुकसान भरपाई द्या, अन्यथा ठिय्या आंदोलन!”
निवेदन देताना कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत कांदा, मका आणि केळीची पिके गळ्यात टांगून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यामुळे शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांची जाणीव करून देण्यात आली.
शिरपूर तालुक्यात जानेवारी महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे भाटपुरा, सावेर, अजनाड, थाळनेर आणि परिसरातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र या भागातील शेतकऱ्यांना अद्यापही अपेक्षित वाढीव नुकसान भरपाई मिळालेली नाही, अशी खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच, 2 एप्रिल रोजी धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शिरपूर तालुक्यातील सुमारे 30 गावांतील शेतीचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांनाही तात्काळ वाढीव नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली.
याशिवाय, अनेक शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम अद्याप थकीत असून ती लवकरात लवकर वितरित करावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास येत्या सात ते आठ दिवसांत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी शिरपूर फर्स्टचे चेतन मोरे, प्रशांत राजपूत, हंसराज चौधरी , शेतकरी संघटनेचे ईश्वर पाटील उपस्थित होते.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा