Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ८ एप्रिल, २०२६
Home
/
Unlabelled
/
दिंडोरी तालुक्यातील २ वेगवेगळ्या घटनांत चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू तर कादवा म्हाळुंगी येथील विद्यार्थ्याचा गळफास लागून मृत्यू.
दिंडोरी तालुक्यातील २ वेगवेगळ्या घटनांत चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू तर कादवा म्हाळुंगी येथील विद्यार्थ्याचा गळफास लागून मृत्यू.
बापू चव्हाण दिंडोरी
दिंडोरी तालुक्यात गेल्या काही दिवसापूर्वी दिंडोरी शहरातील विहिर अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच मंगळवार दि.७ एप्रिल रोजी दिंडोरी तालुक्यात पुन्हा चार विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने दिंडोरी तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त येत आहे. याबाबत माहिती अशी की असे की कादवा नदीत अंघोळीसाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
तालुक्यातील वराखेडा येथील मविप्रच्या जनता विद्यालायाचे विद्यार्थी समीर रावसाहेब गांगोडे (वय वर्ष १४) व यश राहुल पगारे( वय वर्ष १२) दोघे रा.परमोरी हे परमोरीपासुन एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कादवा नदीत अंघोळीसाठी मंगळवारी दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास गेले होते.अंघोळीसाठी नदीत ते उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने कादवा नदीच्या या फुगवट्यात करंजवण धरणातील पाण्याचा प्रवाह जातो.त्यामुळे पाण्याची खोली आधिक आहे.
दरम्यान पाण्यात बुडाल्यानंतर दोघे गटांगळ्या खाऊ लागले व वाचविण्यासाठी मदत मागु लागले तेथे असलेल्या एका इसमाने ही घटना पाहीली व याची माहीती परमोरी गावात दिली.दरम्यान घटनास्थळी ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी धाव घेतली व दोघांचा शोध सुरु केला व वणी पोलिसाना ही माहीती देण्यात आली दरम्यान या दोघा बालकांना नदीतुन बाहेर काढुन वणी ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत दोन्ही बालकांचा श्वासोश्वास बंद झाला उशिरापर्यंत वैद्यकीय कार्यवाही सुरु होती. तसेच तालुक्यातील मोहाडी येथील दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
येथील कुटुंब नवस फेडण्यासाठी खेरवाडी येथील पाझर तलावा शेजारील देवस्थाना जवळ गेले होते दुपारी दिड वाजेच्या सुमारास पाझर तलावात खेळण्यासाठी गेले असता या दोन मोहाडीच्या शाळकरी मुलांचा तलावात पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली.याबाबत मिळालेली माहिती अशी की फटांगडे व जाधव कुटुंब देवाचा नवस फेडण्यासाठी निफाड तालुक्यातील खेरवाडी येथील पाझर तलावा शेजारील देवाचा नवस फेडण्यासाठी गेले होते कुटुंब कामात मग्न असतांना सुनिल शांताराम फटांगडे यांचा मुलगा ओमकार सुनील फटांगडे (वय वर्ष १३) व गणेश रावजी जाधव यांचा मुलगा रुद्र गणेश जाधव (वय वर्ष १३ ) हे खेळत खेळत चालले असतांना कॉर्टर पाझर तलावात पाय घसरून पडले त्यात दोघेही बुडून त्यांचा मृत्यू झाला त्यांच्यावर मोहाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोन घटने नंतर तिसरी
घटना तालुक्यातील म्हाळुंगी येथे घडली असून सुरज हिम्मत
गायकवाड (वय वर्ष १३) कादवा म्हाळुंगी येथे झोका बांधत असताना त्याचा तोल जाऊन झोक्याला साडीचा गळफास बसल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख, भरत कनोज आदी करत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ७१,८३,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त क...
-
संदीप अवधूत :- दिंडोरी येथील खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आटोपून घरी निघालेल्या कुटुंबीयांची मोटार परिसरात असलेल्या शेतातील विहिरीत कोसळल्याने...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा