Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ९ मे, २०२६

दिंडोरी पंचायत समितीच्या स्वच्छता ग्रह त्वरित सुरू करावे,-बापू चव्हाण.





दिंडोरी । प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्याचे मुख्य केंद्र असलेल्या दिंडोरी पंचायत समितीच्या जुन्या आवारातील स्वच्छतागृह गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने येथे येणार्‍या नागरिक आणि महिलांचे मोठे हाल होत आहेत.
स्वच्छ भारत अभियानाचा मोठा गाजावाजा होत असताना चक्क प्रशासकीय कार्यालयाच्या आवारातच ‘शौचालय असतांनाही असून अडचण नसून खोळंबा’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बापू (तात्या) चव्हाण यांनी केली आहे.
दिंडोरी पंचायत समितीच्या जुन्या इमारतीत विविध शासकीय कामांसाठी दररोज हजारो नागरिक, शेतकरी,अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस व इतर कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी येत असतात. तसेच या ठिकाणी बालविकास प्रकल्प कार्यालय,जनजीवन मिशन, आरोग्य विभागाचे कार्यालय आहे. त्यामुळे वयोवृद्ध,शेतकरी आणि महिलांची मोठ्या संख्येने रेलचेल सुरु असते.मात्र,या आवारातील एकमेव स्वच्छतागृह सध्या दुरुस्तीअभावी किंवा देखभालीविना बंद अवस्थेत आहे. स्वच्छतागृहाच्या दरवाजांना कुलूप लावले असून आजूबाजूला घाणीचे साम्राज्य पसरले आहे. महिलांची मोठी कुचंबणा होत असते.तसेच सर्वात जास्त त्रास ग्रामीण भागातून येणार्‍या महिलांना सहन करावा लागत आहे. शासकीय कामे वेळेवर होत नसल्याने अनेकदा तास न तास येथे थांबावे लागते. अशा वेळी नैसर्गिक विधीसाठी कुठे जावे? असा प्रश्न महिलांसमोर उभा राहतो.जवळच्या खाजगी जागांचा व आजूबाजूंच्या इमारतीच्या भिंतीचा आधार घ्यावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.पंचायत समिती प्रशासनाला वारंवार सांगूनही या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 
      नवीन इमारतीचे चकाचक रूप दिसत असले,तरी जुन्या आवारातील या मूलभूत सुविधेचा विसर प्रशासनाला पडला आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.त्यामुळे प्रशासनाने हे शौचालय तातडीने सुरू करावे,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बापू (तात्या) चव्हाण व अपुत्या व नागरिकांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध