Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २१ मे, २०२६
ब्रेकिंग न्यूज | नाशिक विभागात शालार्थ आयडी घोटाळ्याने खळबळ
नाशिक विभागातील कथित शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी येत्या २८ आणि २९ मे रोजी तब्बल ८९३ जणांची अंतिम सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याआधी दोन वेळा सुनावण्या पार पडल्या असून अनेकांनी अपूर्ण कागदपत्रे सादर केल्याचे तर काहींनी संपूर्ण माहिती दिल्याचे समजते. या प्रकरणात शिक्षक,
कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षणाधिकारी, उपसंचालक आणि वेतन अधीक्षक यांच्यासह अनेकांची चौकशी होणार आहे. विशेष म्हणजे २०११-१२ नंतर निवृत्त झालेले मुख्याध्यापक व शिक्षण खात्यातील अधिकारी यांनाही चौकशीसाठी का बोलावू नये? असा सवाल उपस्थित होत आहे.
या चौकशीत आर. एस. शर्मा, किरण कुवर, नितीन बच्छाव, रामचंद्र सुपे, तुकाराम जाधव,बि वि चव्हाण, नितीन उपासनी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आली आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, नितीन उपासनी यांनी एकट्याने हजार बोगस शालार्थ आयडी तयार केल्याची कबुली दिल्याची चर्चा रंगली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे काही शाळांमध्ये एकाच आयडीवर तब्बल १५ शिक्षकांची नियुक्ती झाल्याचे समोर आले आहे. नाशिक विभागात सर्वाधिक तर जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस भरती झाल्याचे बोलले जात आहे. तसेच धुळे जिल्ह्यात संजय भामरेसह काही संस्थाचालकांनीही बोगस भरती केल्याचे आरोप पुढे येत आहेत. शासनाने
या प्रकरणाची मुळापासून चौकशी सुरू केली असून दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिक्षण क्षेत्रातील या कथित गैरव्यवहारामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा