Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २० मे, २०२६

शिरपूर फर्स्ट आयोजित जनसंघर्ष यात्रा २०२६ तुमचा प्रश्न… आमचा संघर्ष..!!



शिरपूर तालुक्यातील जनसामान्यांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी शिरपूर फर्स्टच्या वतीने भव्य जनसंघर्ष यात्रा २०२६ आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा दि. २३ मे ते २७ मे २०२६ दरम्यान शिरपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये जाणार असून, दि. २८ मे २०२६ रोजी शिरपूर शहरातील विविध भागांमध्ये पोहोचणार आहे.

शिरपूर फर्स्ट ही सर्वसामान्यांची क्रांतिकारी चळवळ म्हणून ओळखली जाते. शेतकरी, विद्यार्थी, तरुण, महिला आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारी ही संघटना असून, अतिवृष्टीग्रस्त हजारो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शिरपूर फर्स्टने आंदोलन, पाठपुरावा व संघर्षाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. अनेक ठिकाणी प्रलंबित रस्त्यांसाठी यशस्वी आंदोलने करून नागरिकांना दिलासा दिला आहे.
रस्ता, पाणी, आरोग्य, शासकीय योजना, रेशन, नागरिकांचे हक्क, विद्यार्थ्यांच्या अडचणी, व्यसनमुक्ती, लाडकी बहीण योजनेतील समस्या यांसारख्या विषयांवर नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. गावागावातील समस्या जाणून घेऊन त्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर पाठपुरावा करण्याचा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे.
या यात्रेचा शुभारंभ दि. २३ मे २०२६ रोजी खर्दे येथील दत्तप्रभु मंदिरापासून करण्यात येणार आहे. तसेच दि. २८ मे २०२६ रोजी शिरपूर शहरातील खंडेराव मंदिर येथे यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे.

जनसंघर्ष यात्रा मार्ग पुढीलप्रमाणे राहील :
दि. २३/०५/२०२६सकाळी : खर्दे, उंटावद, सावळदे संध्याकाळी : कुरखळी, थाळनेर
दि. २४/०५/२०२६सकाळी : विखरण, टेकवाडेसंध्याकाळी : तरहाडी, भटाणे
दि. २५/०५/२०२६सकाळी : ताजपुरी, गरताड, अहिल्यापूरसंध्याकाळी : होळनांथे, हिसाळे, बाभळाज
दि. २६/०५/२०२६सकाळी : हिंगोणी, बाळदेसंध्याकाळी : वानावळ, जातोडा
दि. २७/०५/२०२६सकाळी : सुळे, चिलारेसंध्याकाळी : हाडाखेड, दहीवद
दि. २८/०५/२०२६ शहरातील विविध भागात.
या जनसंघर्ष यात्रेसाठी रविंद्र भिल यांची संयोजक म्हणून, तर चैतन्यसिंह जमादार व प्रणव भामरे यांची सह संयोजक व रामेश्वर पावरा नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख पार्थ राजपूत यांनी दिली आहे.
शिरपूर तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या प्रश्नांना आवाज द्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध