Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २० मे, २०२६

विविध मागण्यांसाठी मनसेचे तहसिल कार्यालयावर मोर्चा.


               
                                                                                                                                            बापू चव्हाण दिंडोरी:-

       दिंडोरी तालुक्यातील मुलभूत प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिंडोरी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 
        सरकारने नुकतीच केलेली पेट्रोल/डिझेल दरवाढ रद्द करण्यात यावी, गॅस दरवाढ रद्द करून गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यात यावा, शेतकर्‍यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, कांद्याला सरकारने किमान २१०० रुपये हमीभाव द्यावा तसेच नाफेडमार्फत कांदा थेट बाजार समितीतून खरेदी करण्यात यावा, अनेक रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत असून ती पूर्ण करण्यात यावी,अपूर्ण जलजीवन योजना तातडीने पूर्ण करण्यात याव्यात, घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना हप्ते वेळेवर मिळावेत तसेच नवीन घरकुल यादी मंजूर करून देण्यात यावे,साखर,खाद्यतेल व इतर किराणा मालाच्या वाढत्या दरांवर नियंत्रण ठेवण्यात यावे,रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती कमी करून त्यासोबत द्राव्य खते (लिक्विड) घेणे बंधनकारक करू नये,येणार्‍या खरीप हंगामात बी-बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके मुबलक आणि रास्त दरात उपलब्ध करून द्यावे,काही ग्रामपंचायतींमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी,दिंडोरी ग्रामीण रुग्णालयातील सोनोग्राफी व एक्स-रे मशिन तात्काळ सुरू करण्यात याव्यात,ग्रामीण भागातील अवैध दारू व्यवसाय तात्काळ बंद करण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन तहसिलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले. एवढी पंढरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
       यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज ढिकले, तालुकाध्यक्ष नामदेव गावित, तालुकाध्यक्ष अमोल उगले, सतीश मालसाने,अरुण दुगजे,जगन्नाथ गायकवाड,कुंदन पाटील,अक्षरा घोडके,रिना सोनार,नंदा कराटे, जयेश ढिकले,राजु भवर,गणेश कदम,वैशाली शिंदे,पांडुरंग गावंढे, सुनिल गायकवाड,राजेंद्र गावंढे,बाळु उदार,जालिंदर राऊत, हरिराम भुसारे, तातीराम गवळी,प्रकाश भोये, दिलीप शेवरे,वामन शेखरे,नाना शेखरे,शरद कड,यादव भोये, मुरलीधर कनोज, मधुकर गायकवाड आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध