Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १३ मे, २०२६
येवल्यात मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनासह तब्बल १ कोटी ४७ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या येवला पथकाने अवैधरीत्या वाहतूक केली जाणारी प्रतिबंधित मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनासह तब्बल १ कोटी ४७ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या येवला पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गोवा राज्यात निर्मित व महाराष्ट्रात वाहतूक तसेच विक्रीस प्रतिबंधित असलेला मद्यसाठा नाशिक जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्याकडे घेऊन जात असताना ही कारवाई करण्यात आली टाटा कंपनीच्या ट्रकमधून अवैधरित्या ही मद्य वाहतूक करण्यात येत होती गुप्त माहितीच्या आधारे येवला शहरातील डॉ. ्बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरात सापळा रचून संबंधित ट्रक अडवण्यात आला ट्रकमधून १८० मि.ली. क्षमतेच्या ५७ हजार ६०० सिलबंद प्लास्टिक बाटल्यांमध्ये भरलेला विदेशी मद्य साठा जप्त करण्यात आला.या मद्याची अंदाजे किंमत १ कोटी २६ लाख ७२ हजार इतकी आहे.यावेळी मालवाहू ट्रक व आरोपींकडील तीन मोबाईल संच जप्त करण्यात आले.जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये विदेशी मद्य १ कोटी २६ लाख ७२ हजार इतक्या किमतीचे असून २० लाख रुपयांचा ट्रक,६२ हजार रुपयांचे २ मोबाईल संच असा एकूण १ कोटी ४७ लाख ३४ हजार किंमतीचा मुद्देमाल समाविष्ट आहे.या प्रकरणी रवि मधुकर आवळे (वय २७, रा. शाहापूर, ता. सातारा) व अक्षय राजेंद्र साबळे (वय ३०, रा. शिवथर, ता. सातारा) या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेंद्र देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त उषा वर्मा व अधीक्षक संतोष धायडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अमृत तांबोर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा