Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ जुलै, २०२६
भावली डॅम परिसरात पर्यटक कुटुंबावर हल्ला करणारे मुख्य ०३ आरोपी अटकेत.
माधव खाबिया :-
दि. १२/०७/२०२६ रोजी सायंकाळी ०६:०० वा. चे सुमारास इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीतील भावली डॅम परिसरात पर्यटनासाठी गेलेले कुटुंबावर प्राणघातक हल्ला झाला होता. सदर प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाणेस गुरनं १६६/२०२६ भा. न्या.सं. कलम १०९ (१), ३१० (२), ७४, ७८, १२६ (२), ३२४(४), ३२४(५), १८९, १९१ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचे तपासात इगतपुरी तालुक्यातील ०९ आरोपीतांना अटक करण्यात आली होती. मा. न्यायालयाने सदर आरोपीतांना तीन दिवस पोलीस कोठडी रिमांड सुनावली आहे . यातील अटक आरोपीतांचे इतर साथीदार हे गुन्हा घडल्या पासुन फरार होते सदर गुन्ह्यातील फरार आरोपीतांचे शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखा व इगतपुरी पोलीस ठाणे कडील पथक रवाना करण्यात आले होते. दरम्यान पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार, यातील फरार आरोपी हे मुंबई आग्रा महामार्गाने मुंढेगाव शिवारात मोटरसायकलवर येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्याप्रमाणे स्थागुशाचे पथकाने मुंढेगाव शिवारात सापळा रचून खालील ०३ आरोपीतांना ताब्यात घेतले आहे.१) राहुल भोरू भागडे, वय २६ रा. नांदगाव सदो, ता इगतपुरी, जिल्हा नाशिक.२) आकाश चंद्रकांत भोईर, वय २७, रा. नांदगाव सदो, ता इगतपुरी, जिल्हा नाशिक.३) कैलास अशोक भागडे, वय २८, रा. नांदगाव सदो, ता इगतपुरी, जिल्हा नाशिक.सदर आरोपींना वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांचे कब्जातून गुन्ह्यात वापरलेली हिरो पॅशन मोटरसायकल क्र. एम.एच.१५-के.ए.४५०२ ही जप्त करण्यात आली आहे.
यातील आरोपी क्रमांक १ व २ हे नाशिक ग्रामीण जिल्हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्यांचे विरुद्ध इगतपुरी व घोटी पोलीस ठाणेस खुनाचा प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास इगतपुरी पोलीस ठाणे कडील अधिकारी व अंमलदार करीत आहे.
वरील प्रकरणी नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण विभाग यांनी केलेले मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस निरीक्षक इगतपुरी पोलीस ठाणे यांचे पथकाने सदर गुन्ह्यातील मुख्य ०३ आरोपीतांना अटक करून कारवाई केली आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा