Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३१ जुलै, २०२६
शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेची तात्काळ दखल; वाल्मीक नगरातील धोकादायक खड्ड्याचे काँक्रीटीकरण
शिरपूर, प्रतिनिधी : शिरपूर-वरवाडे नगरपरिषद प्रशासनाने वाल्मीक नगर परिसरातील नागरिकांसाठी धोकादायक ठरत असलेल्या मोठ्या खड्ड्याची तात्काळ दखल घेत त्याचे काँक्रीटीकरण करून समस्या मार्गी लावली. स्थानिक नगरसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या तत्पर कार्यवाहीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
वाल्मीक नगरातील रस्त्यावर निर्माण झालेल्या खोल खड्ड्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला होता. विशेषतः पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचत असल्याने अपघाताची शक्यता वाढली होती. ही बाब स्थानिक नागरिकांनी नगरपरिषदेकडे मांडल्यानंतर प्रशासनाने तातडीने याची दखल घेतली.
नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी पाहणी करून खड्ड्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम तातडीने हाती घेतले. अल्पावधीतच हे काम पूर्ण झाल्याने परिसरातील वाहतूक सुरळीत झाली असून नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे.
या त्वरित कार्यवाहीबद्दल स्थानिक नागरिकांनी नगरपरिषद प्रशासन, संबंधित अधिकारी तसेच स्थानिक नगरसेवकांचे आभार मानले. नागरिकांच्या समस्यांवर तत्परतेने उपाययोजना करण्याची नगरपरिषदेची भूमिका कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केली.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी (प्रतिनिधी): वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध मटका व्यवसाय पुन्हा डोके वर काढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. वणी श...
-
🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨 धुळे जिल्ह्यातील कथित बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नवे दावे! प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपी ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा