Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२६

नळवाडी येथील प्रा.आरोग्य उपकेंद्रात योगा कार्यक्रम संपन्न नागरिकांकडून प्रतिसाद.




बापू चव्हाण दिंडोरी

  दिंडोरी तालुक्यातील नळवाडी येथील प्रा.उपकेंद्रात माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानांतर्गत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.युवराज देवरे व वैद्यकीय अधिकारी डॉ.भगवान पगार यांच्या मार्गदर्शनाखाली योगा कॅम्प आयोजित करण्यात आला होता. 
     यावेळी प्रा.उपकेंद्रांतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी प्रफुल्ला सावळे यांनी गावातील महिला जेष्ठ नागरिक तरुणाई यांच्याकडून योगासने व प्राणायाम करून घेतले. तसेच सूर्यनमस्कार प्राणायाम ज्ञानदान आणि दैनंदिन जीवनातील उपयुक्त असणाऱ्या सोप्या आसनांची प्रात्यक्षिके करून घेतली.त्यानंतर त्यांनी नियमित योगाभ्यास केल्याने होणारे फायदे मानसिक तणाव मुक्ती आणि आजारपणापासून दूर राहण्यासाठी दिनचर्या कशी असावी याबद्दल मार्गदर्शन केले. उपकेंद्राच्या या उपक्रमामुळे गावात आरोग्य विषयी जागरूकता वाढण्यास मदत झाल्याची नागरिकांनी यावेळी सांगितले. 
      यावेळी आरोग्य सेविका नूतन शिंगाडे एम पी डब्ल्यू अभिजीत हर मुडे,आशा अश्विनी गांगोडे यांनी परिश्रम घेतले.याप्रसंगी सोसायटीचे माजी चेअरमन अंबादास ढाकणे,माजी सरपंच एकनाथ गांगुर्डे,ग्रामपंचायत सदस्य सदाशिव बोडके तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामस्थ,महिला,उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध