Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२६
दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी दत्तू भेरे यांची बिनविरोध निवड,
बापू चव्हाण दिंडोरी
दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत दत्तू भेरे यांची बिनविरोध निवड झाली, सहाय्यक निबंधक वैभव मोराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पारपडली.
उपसभापती पदासाठी दत्तू भेरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी वैभव मोराडे यांनी जाहीर केले.त्यांच्या निवडीनंतर संचालक मंडळासह उपस्थित मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला,
यावेळी बाजार समितीचे सभापती प्रशांत कड संचालक योगेश बर्डे, कैलास मवाळ,गंगाधर निखाडे बाळासाहेब पाटील,नरेंद्र जाधव, दत्तात्रय पाटील,प्रवीण जाधव पांडुरंग गडकरी,दत्तू शिंगाडे, दत्तात्रय राऊत, शाम बोडके, महिला संचालक सौ.अर्चना अपसुंदे,सौ. विमल जाधव ,व्यापारी प्रतिनिधी अमित चोरडिया, नंदलाल चोपडा,हमाल-मापारी प्रतिनिधी अशोक पवार उपस्थित होते.
उपसभापती निवड होताच दत्तु भेरे यांचा सभापती प्रशांत कड
कड,सहाय्यक निबंधक वैभव मोरडे व संचालकांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सचिन काकड सहाय्यक निबंधक कार्यालयाचे अधिकारी व बाजार समितीचे सचिव जयेश नाठे रवींद्र गणोरे उपस्थित होते.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मा. खासदार डॉ. शोभाताई ब...
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार भास्कर मु...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा