Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२६
मोहाडी येथे आजपासून (२१ ऑगस्ट ) श्रीकृष्ण प्रबोधन व्याख्यानमाला,७१ व्या वर्षात पदार्पण.
बापू चव्हाण :-
दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव,ग्रामदैवत मोहाडमल्ल व कान्होबा यात्रेनिमित्त गेली ७१ वर्ष अखंडपणे सुरू असलेली गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्ट आयोजित व कर्मयोगी एकनाथभाऊ जाधव फाउंडेशन संयोजित श्रीकृष्ण प्रबोधन व्याख्यानमाला २०२६ आयोजित करण्यात आली आहे.
या व्याख्यानमालेत आज दि. २१ ते २७ ऑगस्ट या कालावधीत गोपालकृष्ण मंदिरात सायंकाळी सहा ते आठ या वेळेत विविध नामवंत वक्त्यांचे व्याख्याने होणार असून यापूर्वी गेल्या ७१ वर्षात व्याख्यानमालेला स्वाध्याय प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले,प्र.के.अत्रे, जयवंतराव टिळक,विद्याधर गोखले,बाळासाहेब भारदे,दाजी पणशीकर,पोपटराव पवार, भास्करराव पेरे पाटील,पाशा पटेल, बच्चू कडू,उत्तमराव कांबळे अशा अनेक क्षेत्रातील विचारवंतांची परंपरा लाभली आहे.
या वर्षीच्या व्याख्यानमालेचे उद्घाटन मविप्र सरचिटणीस नितीन ठाकरे यांच्या हस्ते तर प्रवीण जाधव,शहाजी सोमवंशी, सतीश मोरे,बापूसाहेब पाटील, सुरेश कळमकर,विलास पाटील, कैलास कळमकर,आशा लहांगे, उत्तमराव जाधव यांच्या उपस्थितीत होणार आहे.
व्याख्यानमालेचे पहिले पुष्प शुक्रवार, दि.२१ ऑगस्ट रोजी सामाजिक कार्यकर्ते संशोधक हेरंब कुलकर्णी (‘महात्मा फुले : आजच्या संदर्भात’) या विषयावर ,
शनिवार, दि.२२- इतिहास संशोधक मा.डॉ.श्रीमंत कोकाटे यांचे (‘क्रांतिकारक संत तुकाराम’),
रविवार,दि.२३ - उद्योगपती व सुप्रसिद्ध वक्ते भावेश भाटिया यांचे (‘अंधारातून उजेडाकडे...’ ),
सोमवार,दि.२४ - सुप्रसिद्ध कवी व साहित्यिक मा. इंद्रजित भालेराव यांचे (‘गावाकडं चल माझ्या दोस्ता..’) मंगळवार, दि.२५ - जीवनशैली तज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे (जीवनशैली),
बुधवार, दि.२६ जीवनसंगीत फाउंडेशनचे संस्थापक मा.संतोष बोराडे यांचे (‘जीवनसंगीत’ ),तर व्याख्यानमालेची सांगता गुरुवार, दि.२७ ऑगस्ट रोजी सुप्रसिद्ध वक्ते व सामाजिक कार्यकर्ते मा.इंद्रजित देशमुख यांचे (पसायदान) या विषयाने होणार आहे.
व्याख्यानमालेतल प्रत्येक पुष्प ग्रामस्थांकडून कृतज्ञता म्हणून गावाच्या विकासात व गौरवात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांच्या स्मरणार्थ अर्पण करण्यात येणार आहे त्यात अनुक्रमे सर्व कै.अरुण यशवंत मोगरे,भाऊराव देवराम पाटील,तनवी राजेंद्र जाधव,अनिल रामचंद्र मोगरे,सुरेश तुळशीराम गावित,भारती विनायक कुलकर्णी, भैय्यासाहेब श्रीराम जाधव यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात येणार आहे.व्याख्यानमालेला उपस्थितीचे आवाहन संयोजक कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.विलासराव देशमुख यांनी केले आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा