Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २३ ऑगस्ट, २०२६
Home
/
/
मोहाडी श्रीकृष्ण व्याख्यानमाला पुष्प दुसरे तुकारामांच्या अभंगातून समाजपरिवर्तनाची क्रांती,श्रीमंत कोकाटे
मोहाडी श्रीकृष्ण व्याख्यानमाला पुष्प दुसरे तुकारामांच्या अभंगातून समाजपरिवर्तनाची क्रांती,श्रीमंत कोकाटे
बापू चव्हाण दिंडोरी:-
संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून समाजपरिवर्तनाची क्रांती घडवली. त्यांनी अंधश्रद्धा,कर्मकांड, जातिभेद आणि सामाजिक विषमतेवर परखडपणे प्रहार करून समता,माणुसकी आणि विवेकाचा संदेश दिला,असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केले.
दिंडोरी तालुक्यात मोहाडी येथील गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्ट आयोजित व कर्मयोगी एकनाथभाऊ जाधव फाउंडेशन संयोजित ७१ व्या श्रीकृष्ण व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प ‘क्रांतिकारक संत तुकाराम’ या विषयावर गुंफताना श्रीमंत कोकाटे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र उपाध्यक्ष विश्वासराव मोरे होते.
संत तुकाराम हे केवळ भक्तीपरंपरेतील संत नव्हते,तर त्यांच्या अभंगांमध्ये समाजजागृती आणि परिवर्तनाचा विचार होता. त्यांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून समता आणि माणुसकीचा पुरस्कार केला. त्यांच्या विचारांची आजच्या समाजालाही तितकीच गरज असल्याचे कोकाटे यांनी सांगितले.
हे पुष्प ग्रामस्थांच्यावतीने कृतज्ञता म्हणून कै. भाऊराव देवराम पाटील यांच्या स्मरणार्थ अर्पण करण्यात आले होते.
याप्रसंगी मविप्र संचालक संदीप गुळवे,विजय पगार,अमित पाटील,डॉ.मनोज बर्डे,गोविंद पगार,बापूसाहेब पाटील,शहाजी सोमवंशी,प्रवीण जाधव,युवा उद्योजक कौतिक पाटील,विजय जाधव,ज्ञानेश्वर पाटील,संजय पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमास मोहाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला भगिनी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजन समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ. विलासराव देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन धनंजय देशमुख यांनी केले,तर आभार धनंजय वानले यांनी मानले.
मोहाडी : श्रीकृष्ण व्याख्यानमालेत ‘क्रांतिकारक संत तुकाराम’ या विषयावर मार्गदर्शन करताना इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे. समवेत मविप्र उपाध्यक्ष विश्वासराव मोरे आदी.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा