Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २३ ऑगस्ट, २०२६
आरोग्य मंत्र्यांनी दिले दिंडोरीकरांच्या आरोग्य समस्या सोडविण्याचे निर्देश.
बापू चव्हाण दिंडोरी
दिंडोरी,पेठ,सुरगाण्याच्या आरोग्य सुविधांबाबत आरोग्यमंत्री ना.प्रकाश अबिटकर यांनी ऑनलाईन आढावा घेत आरोग्याच्या समस्या सोडवण्याचे निर्देश आरोग्य विभागाच्या अधिकार्यांना दिले आहे. त्याचबरोबर आठ दिवसात अहवाल सादर करुन हलगर्जी करणार्या कर्मचार्यांवर कारवाई करण्याचे निर्देश सुध्दा ना. अबिटकर यांनी दिल्याने आरोग्य यंत्रणा चांगलीच खडबडून जागी झाली आहे.मागील आठवड्यात नाशिक जिल्ह्यातील आरोग्य सुविधांबाबत दिंडोरीच्या जनआरोग्य समितीच्या वतीने नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी ना. प्रकाश अबिटकर यांना मंत्रालयात निवेदन देण्यात आले होते. त्यात नाशिक जिल्हा रुग्णालयासह दिंडोरी,पेठ,सुरगाणा तालुक्यातील जनतेला भेडसावणार्या समस्या मांडण्यात आल्या होत्या.नाशिक दौऱ्यात ना.अबिटकर यांनी दिंडोरी, पेठ,सुरगाणा दौरा लावला. त्याचबरोबर नाशिकसह जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय रुग्णालय,उपकेंद्र, हिंदुंहद्यसम्राट आपला दवाखाना आदींच्या आरोग्य समित्यांची, लोकप्रतिनिधींची ऑनलाईन बैठक घेतली.
या बैठकीत त्यांनी दिंडोरीचा आढावा घेतला.यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास मवाळ, शासकीय जनआरोग्य समितीचे अध्यक्ष नितीन गांगुर्डे,नगराध्यक्षा आशा कराटे यांनी ग्रामीण भागातील जनतेच्या व्यथा आरोग्य मंत्र्यांसमोर मांडल्या.दिंडोरी शहरात भेडसावणारे प्रश्न,108 रुग्णवाहिकेच्या तक्रारी, लॅबीज व सर्पदंश लसीचा तुटवडा, इंदिरानगर,गांधीनगरच्या दवाखान्यात औषध पुरवठा, नाशिक जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतागृहाची दुरावस्था,गरोदर मातेचे प्रश्न,दिंडोरीतील सोनोग्राफी सेंटरची दुरावस्था,स्त्री रोग तंज्ञाची गरज आदी विषयांवर नगरसेवक नितीन गांगुर्डे व कैलास मवाळ यांनी तक्रारी केल्या व समस्या सोडवण्याचे आवाहन केले. दिंडोरीकरांचे प्रश्न मांडल्याने आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी गांगुर्डे व मवाळ यांचे अभिनंदन केले.
येत्या आठ दिवसात समस्यांवर अहवाल देण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य संचालक, सचिव तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिले. हिंदुहद्यसम्राट आपला दवाखाना येथे स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष हिंदुहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण योजनेतून मंजूर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिले.यावेळी वणी येथील ट्रामा केअर सेंटरबाबत तक्रार नितीन गांगुर्डे यांनी केली.सप्तशृंगगड आणि सापुतारा रस्त्यावर होणार्या अपघाताबाबत ट्रामा सेंटरमध्ये सुविधा नसल्याचे निर्देशानास आणले.याबाबत तातडीने लक्ष घालण्याचे निर्देश आरोग्य अधिकार्यांना देण्यात आले. दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. काळे यांनी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाची माहिती सादर केली.यावेळी समस्या जाणून घेतल्याने आरोग्यमंत्री ना. अबिटकर यांचे दिंडोरी नागरिकांच्या वतीने आभार मानण्यात आले.
बैठकीस खासदार भास्कर भगरे,जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज आहिरे,सुनील घुटे,शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे,विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर क्षिरसागर,डॉ.पूजा शेळके,डॉ.सायली,मीना भोसले, अधिपरिचरिका श्रीमती ठाकूर, क्रांती पगारे,अनुराधा कुमावत, लीना जाधव,रोहिणी कदम, समुपदेशक रिना चारभे,सुरेखा पांगरे,नीलम वणीस,तुषार पांडव यांसह अनेक लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा