Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२६
Home
/
/
शिवसेना पक्षाची संघटनात्मक आढावा बैठक महाराष्ट्र राज्याचे सघटक खासदार परांजपे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न.
शिवसेना पक्षाची संघटनात्मक आढावा बैठक महाराष्ट्र राज्याचे सघटक खासदार परांजपे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न.
बापू चव्हाण दिंडोरी:-
शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या,संसदरत्न खा श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना राज्य संघटना प्रमुख माजी खासदार आनंद परांजपे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिडोरी लोकसभेची बैठक शिवसेना कार्यालय,धर्मवीर आनंद दिघे चौक अक्राळे फाटा येथे शिवसेना पक्षाची महत्त्वपूर्ण संघटनात्मक आढावा बैठक संपन्न झाली.
यावेळी पक्ष संघटना अधिक मजबूत व सक्षम करण्याबाबत, तसेच आगामी काळातील संघटनात्मक वाटचालीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यासोबतच जिल्हाप्रमुख,मा. आमदार, विधानसभा प्रमुख तालुकाप्रमुख,शहरप्रमुख,व नगरप्रमुख उपतालुका प्रमुख यांच्याशी सविस्तर पक्षा बांधणी, होऊ घातलेल्या जिल्हापरिषद, पचायत समिती निवडणूक, पक्षातील अडचणी,पक्षातील पुढिल वाटचालीस काय केले पाहिजे,स्थानिक प्रश्न,विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
शिवसेना पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करत तळागाळातील शिवसैनिकांशी संपर्क वाढविणे,पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे आणि आगामी काळात संघटनेला अधिक गतिमान करण्यासाठी आवश्यक नियोजन यावेळी करण्यात आले.
या बैठकीस शिवसेने दिडोरी लोकसभेचे जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे,उपजिल्हाप्रमुख देवा बापु वाघ,जितेंद्र वाघ, शाताराम ठाकरे,विधानसभा प्रमुख,तालुका प्रमुख किशोर कदम दिडोरी,पद्माकर कामडी पेठ,शरद पगार कळवण,हरीभाऊ भोये सुरगाणा,निलेश ढगे चादवड, दिपक निकम देवळा,पांडुरंग पाटिल येवला,पिपळगावचे नगरसेवक निलेश पाटिल,किरण लभडे,दिडोरी शहरप्रमुख सुरेश देशमुख,उपशहरप्रमुख सुधाकर बोरस्ते विधानसभा प्रमुख अतुल वाघ मा.नगराध्यक्ष सचिन देशमुख, उपतालुका प्रमुख चितामण मोरे, देविदास वाळके,नंदु गटकळ, धनजय मौले,जितेंद्र वडजे,रमेश झिरवाळ,देवळा शहरप्रमुख सोमनाथ शिंदे उपशहरप्रमुख खुशाल देवरे,उपतालुका प्रमुख जगदिश खैरणार,सचिन शेवाळे, विजय अहिरे,कळवण तालुक्यातील शहरप्रमुख मुन्ना पगार,विशाल मुर्तडक, कार्यकर्ते
व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा