Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २१ सप्टेंबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
चोपडा येथे लाच प्रकारणी कालवा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात,दाखला देण्यासाठी मागितली लाच
चोपडा येथे लाच प्रकारणी कालवा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात,दाखला देण्यासाठी मागितली लाच
चोपडा प्रतिनिधी,, विनोद निकम
चोपडा येथील पाटबंधारे उपविभाग कार्यालयातून लाभक्षेत्र दाखला देण्यासाठी ४००(चारशे) रुपयांची लाच मागणाऱ्या कालवा निरीक्षक विजय गिरधर पाटील(५७ हतनुर कॉलनी चोपडा)यांना लाच स्वीकारताना जळगाव येथील एसीबीच्या पथकाने शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास चोपडा हातनूर कार्यालयाच्या आवारातच रंगेहात अटक केली या कारवाईने पाटबंधारे विभागात खळबळ निर्माण झाली आहे .
चोपडा तालुक्यातील सत्तर वर्षीय तक्रारदार व त्यांच्या भाउबंदकीच्या नावे असलेली वडिलोपार्जित शेतीची खाते फोड करण्यासाठी त्यांना लाभ क्षेत्र बाबत तसा दाखला हवा असल्याने त्याने चोपडा कार्यालयात शुक्रवारी संपर्क साधल्यानंतर आरोपी कालवा निरीक्षक विजय पाटील यांनी चारशे रुपयांची लाच
मागितली.तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवलेली होती लाचेची पडताळणी झाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक श्री जी एम ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नीलेश लोधी व संजोग बच्छाव, नाईक मनोज जोशी, प्रशांत ठाकूर, कॉन्स्टेबल श्री पाटील श्री नासिर, श्री देशमुख, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने आरोपीला कार्यालयाच्या आवारातच लाच घेताना रंगेहात पकडले . चोपडा शहर पोलिस स्टेशनमध्ये अटक करण्यात आली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा