Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, २१ सप्टेंबर, २०१९
खलाणे चे माजी सरपंच विजय टाटीया यांना झोडपले
शिंदखेडा प्रतिनिधी :खलाणे येथील रहिवासी माजी सरपंच एका प्रख्यात वृत्तपत्राचे माजी संपादक विजय टाटिया यांना काल शिंदखेडयात जबर मारहाण करण्यात आली
महिलांनी मारहाण केल्याने जिल्ह्यात नव्हे तर संपुर्ण राज्यात हा चर्चेचा विषय झालेला आहे विजय टाटिया यांना का मारहाण करण्यात आली यामागील गौडबंगाल काय याची खमंग चर्चा आता होऊ लागली आहे दरम्यान काल झालेल्या या घटनेमुळे शिंदखेडा पोलिसात दोन्ही गटांकडून गुन्हा दाखल केला असून विजय टाटिया यांच्यावर महिलांचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकेकाळचे दक्ष पोलीस टाईम या वृत्तपत्राचे संपादक विजय हराकचंद टाटिया या शिंदखेडा तालुक्यातील खलाणे येथील मूळचे रहिवाशी आहेत पत्रकारितेच्या जोरावर त्यांनी खलाणे येथील सरपंच पद उपभोगले आहे तालुक्यात व जिल्ह्यात त्यांची दडपशाही सुरू होती आज ती अखेर उघड झाली आहे या सौद्यात पैशाची देवाणघेवाण देखील झाल्याचे समजते यासंदर्भात संपूर्ण जिल्ह्यात व्हिडीओ क्लिप देखील व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे काल शिंदखेडा येथिल न्यायालयाच्या कामानिमित्त श्री टाटीया शिंदखेडा येथे आले असताना बाबूळदे येथील मूळचे रहिवाशी हल्ली मुक्काम धुळे विलास शिंदे यांच्या प्रॉपर्टी च्या वादावरून हे भांडण झाल्याचे समजते दरम्यान शिदखेळा येथील शिवाजी चौकात ते आले असताना विलास शिंदे यांच्या पत्नी सह बहिण व इतर महिलांनी त्यांना जबर मारहाण करण्यास सुरुवात केली शिवाजी चौक ते बस स्टँड च्या पावेतो त्यांची मारहाण करीत कॉलर पकडीत धिंड काढली याप्रकरणी शिंदखेडा पोलीस सात विजय टाटिया यांनी फिर्याद दिली असून भाद वि कलम 307 143 323 504 506 मुंबई पोलीस ऍक्ट कलम 37 चे उल्लंघन तर शिंदे कडून विनयभंग केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी करीत आहेत
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रेयसीला शेवटचा व्हिडीओ कॉल -बनावट नावाने लॉज मध्ये राहिला अमळनेर : गुजरात मधील अहमदाबाद मधील पोस्को चा गुन्हा दाखल असलेल्या एका आरो...
-
अमळनेर : तालुक्यातील जवखेडा येथे मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वीज चमकल्याने घोड्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सायंकाळी अ...
-
मोटरसायकल वर दूध वाहून नेणाऱ्या जानव्याच्या भाग्यश्रीचे अपघाती निधन अमळनेर : वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून पित्यासाठी ‛भाग्यश्री’ ठर...
-
अमळनेर : भुसावळ सुरत पॅसेंजर मध्ये अवघ्या एक महिन्याच्या बाळाला टाकून आई वडील अमळनेर स्थानकावर उतरून गेल्याची घटना ९ रोजी रात्री घडली. ...
-
शिरपूर प्रतिनिधी : परिस्थिती सोबत संघर्ष करीत पत्रकार गणेश जैनांनी पाहिलेले स्वप्न त्यांची लेक तनिष्का जैन हिने दहावीच्या गुणवत्ता यादीत यत...
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर कृषि उत्पन्न बाजार समिती येथून १९ मे २०२५ रोजी सकाळी ८ वाजता सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, जिल्हास्तरीय तिरंगा यात्रा आय...
-
साक्री तालुक्याचे प्रगतीशील शेतकरी श्री विशाल दिलीप खैरनार.में वाय.जी.मोरे सिड्स अँड पेस्टीसाईड चे संचालक यांच्या मौजे विठाई येथील शेतात कलश...
-
नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून श्री जितेंद्र दामोदर पगारे (सर) नंदुरबार जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ पुरस्कार...
-
पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्...
-
नाशिक प्रतिनिधी :नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या डिके नगर पोलीस चौकीत रात्री अकरा वाजेच्या सुमारास ४ ते ५ पोलीस कर्मचारी ओली पार्...
Nice work hats of tarun garjana
उत्तर द्याहटवा