Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २३ फेब्रुवारी, २०२०
हुंडाबंदीचा प्रचारप्रसार होणे महत्त्वाचे... श्री अर्जुनभोई मुंबई
उत्तर महाराष्ट्राच्या दौ-यावर असतांना आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे हुंडाबंदीवर पुन्हा एकदा यश आले. पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील वधूचे पिताश्री भगवान रामचंद्र भोई आणि वरखेडी येथील वराचे पिताश्री प्रकाश दशरथ वाडीले-भोई यांच्यात आज हुंडाबंदीच्या बाबतीतील निर्णय घेण्यापरी कार्य करण्यात आले आणि दोन्ही वरवधुच्या पित्यांनी आपल्या पाल्यांना सामाजिकपटलावर एक करण्याचा प्रयत्न केला. हा समाजपटलावर पुन्हा एकदा मैलाचा दगड ठरतांना दिसत आहे त्यातुनच पुन्हा जळगांव जिल्ह्यात आनंद होत आहे आणि त्या प्रसंगाचे आम्ही साक्षीदार होतांना ही आम्हाला सामाजिक समाधान लाभत आहे. या सामाजिक मनोमिलनाच्या कार्याच्या वेळी सुक्राम सुर्यवंशी विजय भोई देवराम सुर्यवंशी रेणाबाई शिवदे अल्का सुर्यवंशी शांताराम भोई सत्यम तमखाने जितुजी शिवदे आकाश नंदाने मोहन शिवदे आनंदराव शिवदे रतनलाल सुर्यवंशी मीना नंदाने लताबाई तमखाने खंडू भोई सखाराम भोई धनराज भोई तसेच यावेळी विशेष उपस्थिती लाभली ती शिरलेली येथील समाजसेवक, हुंडाबंदीची कृती स्वत:च्या मुलाच्या लग्नात स्वत: करणारे अरुण भगवान मोरे हे ही यावेळी उपस्थित होते. त्यांनी हुंडा प्रतिबंधक कायद्याबाबत जनजागृतीपर आपले विचार व्यक्त केले. हुंडाबंदी होणे तसेच त्याची अंमलबजावणी होणे हे सामाजिक समाज पटलावरील एक सामाजिक कार्य ठरत आहे असे आम्हास तरी वाटते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...

Very good job sire keepit up
उत्तर द्याहटवा