Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

परंडा तालुक्याला खरीप हंगाम 2019साठी 24कोटी 89लाख रु निधी मंजूर..!



उस्मानाबाद (राहूल शिंदे)दि.20 जिल्ह्यातील परंडा तालुका खरिप-2019 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना अनुदान मंजूर

खरीप हंगाम 2019 मध्ये परंडा तालुक्यातील 96 गावांत पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही. शेतकऱ्यांनचा खरिप हंगाम वाया गेला. त्यामुळे  दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. पेरणी न झालेल्या क्षेत्रांचे पंचनामे झाले होते. 

नंतर अवेळी झालेली पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान मिळाले परंतु पेरणी न झालेल्या शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित होते. माजी जलसंधारण मंत्री विद्यमान आमदार  प्रा.तानाजीराव सावंत साहेब यांच्या समवेत त्याअनुषंगाने मदत व पुनर्वसन सचिव मा.किशोर राजेनिंबाळकर साहेब यांच्या कडे वेळोवेळी भेटून सातत्याने पाठपुरावा चालू होता. 

या पाठपुराव्याने तालुक्यातील 96 गावातील 35612 हेक्टर वरिल क्षेत्रावरील पिकांसाठी 24 कोटी 89 लाख मंजूर झाला आहे. ही मदत बाधित शेतकऱ्यांना 2 हेक्टर मर्यादित असून तालुक्यातील बागायती क्षेत्र 602 हेक्टर  आहे. प्रति हेक्टर 18000/- व जिरायती क्षेत्र 35010 हेक्टर. आहे. प्रति हेक्टर 6800/- मिळणार असून 26 ऑगस्ट नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील.अशी माहिती जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर साहेब यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटद्वारे दिली आहे.

या शासनाच्या निर्णयाबद्दल तालुक्यातील शेतकरी वर्गाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे व समाधान व्यक्त होत आहे.



1 टिप्पणी:

प्रसिद्ध