Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३० जुलै, २०२१

शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक म्हणून रवींद्र देशमुख यांनी पदभार स्विकारला



शिरपूर प्रतिनिधी:-शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक म्हणून रवींद्र देशमुख यांनी पदभार स्विकारला आहे.अनेक दिवसांपासून पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या बदली नंतर शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणून कोण ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.मात्र आज दि 29 रोजी रात्री पोलीस निरीक्षक देशमुख यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशनात येथे कार्यभार स्विकारला आहे.

यापूर्वी शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती त्यानंतर साहाय्यक पोलीस निरीक्षक फड यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला होता.शिरपूर पोलीस स्टेशन येथे कोण अधिकारी येतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र आता पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्विकारला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध