Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २९ जुलै, २०२१

शिंदखेडा तालुक्याचे ज्योतिषरत्न पुंडलिक चंद्रात्रे गुरुजी यांना पुणे येथील संस्थेच्या वतीने तेजोवलय पुरस्कार..!



शिंदखेडा प्रतिनिधी= शिंदखेडा तालुक्यातील साळवे येथील मुळगाव असलेले सेवानिवृत्त तलाठी पुंडलिक  दिगंबर चंद्रात्रे गुरुजी यांना राज्यातील ज्योतिष व पुरोहित या नोंदणीकृत संस्थेच्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या संस्थेच्यावतीने तेजोवलय हा पुरस्कार जाहीर झाला आहे 26 जुलै रोजी ऑनलाइन पद्धतीने पुणे येथून मान्यवरांच्या हस्ते श्री चंद्रात्रे गुरुजी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
      

मूळचे शिंदखेडा तालुक्यातील साळवे येथील ज्योतिष विशारद पुंडलिक दिगंबर चंद्रात्रे गुरुजी हे सेवानिवृत्त तलाठी देखील आहेत महसूल प्रशासनात भरपूर वर्षे त्यांनी प्रशासकीय सेवेत घालवले आहेत 
श्री सनातन विद्या फाउंडेशन ज्योतिष व पुरोहित यांची राज्यातील पहिलीच  नोंदणीकृत संस्थेच्या वतीने संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त ज्यांनी घडवले ज्यांनी मोठे केले असे ज्योतिष मार्गदर्शक पंचांगकर्ते मोहन शास्त्रीजी दाते सुप्रसिद्ध भागवतकार झी मराठी वेध भविष्य मधील वेदमूर्ती अतुल शास्त्री भगरे गुरुजी फलज्योतिष ज्ञानपीठ चे अध्यक्ष पंडित विजय जकातदार बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार मेदिनीय ज्योतिष तज्ञ परिषदेचे अध्यक्ष सिद्धेश्वर जी मारटकर ज्योतिष भास्कर यांना दीपस्तंभ पुरस्कार देण्यात आला आहे. 

तसेच राज्यातील 60 पेक्षा जास्त पुरोहित ज्योतिषी यांना तेजोवलय हा पुरस्कार संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे यासह ज्ञानज्योती गिरणार वत्स रुग्ण मित्र हे पुरस्कारही मान्यवरांना देण्यात आले हा सोहळा झूम मीटिंग च्या माध्यमातून 25 जुलै रोजी सायंकाळी चार वाजता पुणे येथे संपन्न झाला शिंदखेडा तालुक्यातील प्रथमच ज्योतिष विशारद श्री पुंडलिक चंद्रात्रे गुरुजी यांना मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. 

याप्रसंगी कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार मेघाताई कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय दत्तात्रय रत्नाकर गुरुजी कार्याध्यक्ष भूषण रत्नाकर जिल्हाध्यक्ष निलेश बुरझडकर तालुकाध्यक्ष मिलिंद पाठक यांच्यासह श्री सनातन विद्या फाउंडेशन विश्वस्त मंडळ यांनी केले होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध