Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २८ जुलै, २०२१

कुंद्रा याने तयार केलेल्या फिल्म्स पॉर्न नसून त्या एरॉटीक असल्याचे सांगणा-या शिल्पासह इतरांच्या बॅंक खात्याची चौकशी..!



मुंबई : बॉलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा सध्या पोर्नोग्राफी प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहे.राज कुंद्रा याने तयार केलेल्या फिल्म्स पॉर्न नसून त्या एरॉटीक असल्याचे सांगणा-या शिल्पासह इतरांच्या बॅंक खात्याची चौकशी केली जाणार आहे. अटकेतील राज कुंद्रा याच्या बॅंक खात्यासह आर्थिक व्यवहारांची चौकशीकामी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेशन शाखेने फॉरेन्सिक ऑडिटरची नियुक्ती केली आहे.

राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी, अरविंद श्रीवास्तव, हर्षिता श्रीवास्तव यांच्यासह संबंधीतांच्या बँक खात्यांची चौकशीकामी फॉरेन्सिक ऑडिटर्सना पाचारण करण्यात आले आहे. गुन्हे अन्वेशन शाखेच्या अधिकाऱ्यांनी म्हटल्यानुसार या प्रकरणी राज कुंद्राची पत्नी तथा बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला अजून क्लिन चिट देण्यात आलेली नाही.

राज कुंद्रा यांचे बँक खाते आणि विवान इंडस्ट्रीजचे संयुक्त खाते, ज्यामधे शिल्पा दिग्दर्शक होती त्याची देखील चौकशी प्रगतीपथावर आहे. ही कंपनी कथित पॉर्न फिल्म प्रकरणाच्या अग्रभागी आहे. विदेशातून पैसे जमा होत असलेली अशी अनेक बॅंक खाती कुंद्राकडे आहेत. शिल्पा शेट्टीने संचलित केलेल्या बॅंक खात्यातील व्यवहाराची अद्याप माहिती पुढे आलेली नाही. हा तपासाचा भाग असून त्यामुळे अद्याप शिल्पा शेट्टीला क्लिन चिट देण्यात आलेली नाही.

पंजाब नॅशनल बॅंकेत शिल्पा शेट्ट व राज कुंद्रा यांचे एकत्रीत खाते आहे. ते खाते संशयास्पद असल्याचे म्हटले जात आहे. या खात्यात राज कुंद्रा पोर्नोग्राफीच्या व्यवसायातून आलेले पैसे जमा करत होता. ते पैसे शिल्पा देखील हाताळत होती. याशिवाय शिल्पा शेट्टीच्या नावामुळे व्यवसायातून मिळणारी कमाई व त्यातून क्रिप्टो चलनातील गुंतवणूकी बाबत पुरावे देखील पुढे आले आहेत. आपल्याला पतीच्या व्यवसायाची माहिती नव्हती असे शिल्पा म्हणत असून त्याला फसवण्यात आले असल्याचे शिल्पा म्हणत आहे. या प्रकरणात राजचा मेहुणा प्रदिप बक्षी हा असल्याचे तिचे म्हणणे आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध