Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २१ जुलै, २०२१

विद्यार्थ्यांच्या प्रलंबित समस्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात यावा भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्याकडे शहराध्यक्ष विक्की चौधरी यांची पत्राद्वारे मागणी..!



शिरपूर प्रतिनिधी:शहरातील विद्यार्थ्यांच्या अनेक प्रलंबित समस्या आहेत. त्यात इ.11 वी प्रवेश प्रक्रियेसाठीची मूल्यांकन पद्धती,12 परीक्षा बाबतची अस्पष्ट भूमिका, परीक्षा शुल्क माफी, शाळा महाविद्यालये फी मध्ये सूट अश्या अनेक महत्त्वपूर्ण विषयावर राज्य सरकारकडून सदर विषयांमध्ये अपेक्षित कार्यवाही आपण लक्ष घालुन विद्यार्थ्यांच्या या समस्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यात यावे यासाठी माजीमंत्री आ.अमरीशभाई पटेल,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी,आ. काशिराम पावरा,भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी,शहराध्यक्ष हेमंत पाटील, भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांचा मार्गदर्शनाखाली शिरपूर भाजयुमो तर्फे मागणीचे पत्र भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांना शहराध्यक्ष विक्की चौधरी यांनी दिले. विद्यार्थ्यांच्या विविधी समस्यांबाबत धुळे दौर्‍यावर असलेले भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांना भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशुतोष पाटील यांचा प्रमुख उपस्थित शिरपूर भाजयुमो शहराध्यक्ष विक्की चौधरी यांनी धुळे येथे दि. २१ रोजी निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांच्या पुढील महत्त्वपूर्ण मागण्या आहेत. या SSC बोर्ड परीक्षेसाठी अंदाजे १७ लाख विद्यार्थी बसणार होते आणि त्यांच्याकडून प्रत्येकी अंदाजे रु.४१५/- इतके परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे. या माध्यमातून एकत्रितपणे अंदाजे ६८ करोड़ पेक्षा जास्त रक्कम राज्य सरकारकड़े परीक्षा शुल्कापोटी जमा झाली आहे. 

जर सरकार परीक्षा घेणार नाही तर विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क का परत केले जात नाही,? विद्यार्थ्यांच्या या पैशामध्ये तरी सरकारने पारदर्शकता ठेवावी व सदर परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना त्वरीत परत करावे, १० वी SSC परीक्षा रद्द केल्यावर आता ११ वीची प्रवेश प्रक्रीया कोणत्या निकषांच्या आधारे केली जाणार आहे. या बाबतचे धोरण अजूनही राज्य सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेले नाही, त्यामुळे विद्यार्थी व पालक यांच्या मनात प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे. सदर विषयात सरकारने आता वेळ न दवडता भूमीका त्वरीत स्पष्ट करावी,महाराष्ट्रातील सर्वच विद्यालये आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचें परीक्षा शुक्ल विद्यापीठांकडून विनाशर्त माफ करण्यात यावे, सध्या महाविद्यालयात साधारण २० वेग-वेगळे प्रकारचे शुल्क आकारले जात आहेत, परंतु महाविद्यालयातील वाचनालय, प्रॅक्टिकल लॅब, कम्प्युटर लॅब, वास्तू, मैदान, वर्गखोल्या या सर्वासाठी लागणारी वीज या सर्व गोष्टींचा वापर होत नसल्याने शाळा/ महाविद्यालयांनी केवळ ट्युशन फी आकारावी आणि अन्य सर्व प्रकारचे शुल्क माफ करावे. असे आदेश महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने द्यावेत जे विद्यार्थी कोविड-१९ मुळे थेट प्रभावित झालेले आहेत, त्यांची फी महाविद्यालयातर्फे माफ करण्यात यावी, अथवा सरकारने हस्तक्षेप करून त्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करून त्यांची फी भरावी. फी भरण्याची स्थीती असलेल्या विद्यार्थ्यांना फी टप्प्या टप्प्याने भरण्याचीं सुविधा द्यावी.  महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना आरोग्य विमा संरक्षण देण्यात यावे. विद्यार्थ्याचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण ते शिकत असलेल्या शाळा/महाविद्यालयातच करून घेण्याची यंत्रणा सरकारने लावावी. या सर्व मागण्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असल्याने आपण या महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करुन विद्यार्थ्यांना मदत करावी अशी मागणीचे निवेदन प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांना शिरपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शहराध्यक्ष विक्की चौधरी यांनी दिले. यावेळी संदीप थोरात, राज सिसोदिया, पप्पु राजपूत, ओम मराठे, दिपक पवार, यश पवार, सुनिल शिंदे, भुपेश परदेशी, प्रशांत कोळी, पंकज पाटील आदी  पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध