Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २६ जुलै, २०२१

श्री.मुरलीधर मन्साराम भोई यांची भोई समाज नाईक म्हणून नियुक्ती..!

                                                        
        
शिरपूर (प्रतिनिधी) शिरपूर शहरात एक महिन्यापासून भोई समाजाचे भाट श्री संतोष गोपीचंद भोई रा.पिळोदा ता.शिरपूर हे संपूर्ण शहरात भोई समाजाच्या घरोघरी जाऊन प्रत्येकाचे वंशावळाच्या पोथी वाचून त्या त्या कुळाचे समाधान करीत आहेत.

ज्यांच्या घरी नवीन सुनबाई आली असेल,ज्यांच्या घरी नवीन लहान बाळाचा जन्म झाला असेल असे घरात नवीन सदस्य वाढले असतील त्यांची नावे वंशावळ पोथीत श्री संतोष भाऊ हे नावे ऍड करीत आहे त्यांना शहरात सर्व भोई समाज बांधव,
शहराचे नाईक व पंच मंडळी सहकार्य करीत आहेत.बऱ्याच वर्षांपासून शिरपूर शहरात भाट दाखल झाले म्हणजे ते शहराचे नेमलेले नाईक यांचेकडे थांबत असतात.

आजपर्यंत नाईक हे ढोले परिवारातील कै.अनाजी भोई यांचे घराण्यातीलच सदस्य राहिलेले आहेत व तीच परंपरा सुरु आहे. मागील बऱ्याच वर्षांपासून कै.दंगल मन्साराम भोई हे शहराचे नाईक म्हणून कामकाज पाहत होते परंतु मागीलवर्षी त्यांचे निधन झाल्यामुळे परंपरेनुसार या वर्षापासून त्यांचे लहान बंधू श्री.मुरलीधर भोई यांची शिरपूर शहराचे नाईक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे व तशी नोंद वंशावळ पोथीत करण्यात आली आहे.

या नियुक्ती बद्दल शिरपूर शहराचे भोई समाजाचे पंच मंडळाचे अध्यक्ष सी.एम.भोई सर,पंच मंडळाचे सदस्य भाईदास मोरे, गुलाब भोई, सुभाष भोई, रविंद्र सोनवणे, संतोष गंभीर भोई,भोजराज ढोले, दिलीप ढोले, दिलीप हारचंद मोरे, संजय दगा ढोले, सरलाल भोई, राजू सोनवणे, हिम्मत सोनवणे, डॉ.डिघोरे,श्रीनिवास ढोले, सुदाम मोरे,जगदीश मोरे, यशवंत निकवाडे ,संदीप वाडिले,प्रा.राजू वाडिले,मंगलदास वाडिले,मोहन ढोले राजू सोनवणे, गोकुळ भोई,अरुण मोरे,राजू मासा वाले,कांतीलाल तावडे, प्रशांत तलाठी आप्पा वैगरे व सर्व समाज बांधवांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध