Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, २६ जुलै, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिरपूर एस.टी.डेपो चे बांधकाम संथगतीने,आमदार काशिराम पावरा यांनी भेट देऊन व्यक्त केला संताप..!
शिरपूर एस.टी.डेपो चे बांधकाम संथगतीने,आमदार काशिराम पावरा यांनी भेट देऊन व्यक्त केला संताप..!
शिरपूर प्रतिनिधी:शहरातील एस.टी.डेपो चे बांधकाम खूपच संथ गतीने सुरु असूूून आमदार काशिराम पावरा यांनी आज भेट देऊन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संताप व्यक्त केला. तसेच शिरपूर बस स्थानकाचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देऊन प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याचाही सूचना दिल्या.
शिरपूर बस स्थानकातील वर्कशॉप चे नवीन बांधकाम गेल्या वर्षी सुरू झाले आहे. एस. टी. महामंडळा कडून श्री.एन.एम. सोनवणे कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले आहे.एका वर्षात एस.टी.बस स्थानकाचे काम पूर्ण व्हावे अशी अपेक्षा होती.परंतु,नवीन बसस्थानकाचे काम झालेले नाही.यामुळे तालुक्यातील प्रवाशांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांनी सोमवारी दि.२६ जुलै रोजी शिरपूर बस स्थानकात जाऊन भेट दिली व कामाची पाहणी केली.
या ठिकाणी एस. टी. वर्कशॉप च्या समोर मोठ्या जागेत गेल्या वर्षापासून नवीन एस. टी. डेपो वर्कशॉप चे दोन मजली आर. सी. सी. काम सुरु आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर एस. टी. बस स्थानकाचे काम सुरू होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार काशिराम पावरा यांनी एस. टी. महामंडळाचे नाशिक येथील कार्यकारी अभियंता व धुळे येथील उप अभियंता यांच्याशी संपर्क साधून कामाबाबत विचारपूस करून संताप व्यक्त केला. अधिकाऱ्यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेत मजुरांअभावी व निधीअभावी कामात अडथळे आल्याचे सांगितले.
तसेच यावर्षी देखील निधी अभावी नियमितपणे काम करण्यात अडचणी आल्याचे सांगितले. यावेळी आमदार काशिराम पावरा यांनी यावर्षी कोरोना काळात कोणतेही विकास कामे थांबवू नये अशा शासनाच्या स्पष्ट सूचना असल्याचे सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांनी महामंडळाकडून निधी मिळत नसल्याचे सांगितले.
श्री.एन.एम.सोनवणे कन्स्ट्रक्शन कंपनी चे मालक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आतापर्यंत झालेल्या शिरपूर एस. टी. डेपो वर्कशॉप च्या दोन मजली कामात आतापर्यंत एकही रुपया निधी महामंडळाकडून मिळाला नसल्याचे सांगितले. कोरोनामुळे एस.टी. महामंडळाला आर्थिक फटका बसल्याने महामंडळाकडून निधी मिळत नसल्याचे समजते. हे सर्व ऐकल्यानंतर आमदार काशिराम पावरा यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना एस. टी. बस स्थानकाचे काम वेळेत पूर्ण करावे व प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशा स्पष्ट सूचना दिल्या.
संबंधित अधिकाऱ्यांनी देखील लवकरच पाठपुरावा करून शिरपूरचे बस स्थानक प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी एस. टी. डेपो मॅनेजर वर्षा पावरा, वाहतूक नियंत्रक मनोज पाटील, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
तरूण गर्जना रिपोट :_ २९ मे ते २ जून सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीने बाहेर (खुल्या आकाशाखाली) जाऊ नये कारण हवामान विभाग...
-
प्रचिती इंटरनॅशनल स्कूल कावठे (साक्री) येथील तीन शिक्षकांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य इंग्लिश मीडियम...
-
पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्...
-
मुदतीत बांधणाऱ्यांना वाढीव अनुदान द्या तालुका काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन अमळनेर : तालुक्यातील अनेक शासकीय घरकुल लाभार्थ्यांन...
-
शेवग्याचा मेव्हणा व खवशी च्या आरोपींना अटक अमळनेर प्रतिनिधी : धुळे जिल्हयातील फागणे येथील आपल्या शालकाची विम्याची रक्कम हडप करण्यासाठी शे...
-
जानेवारीत १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघाल्याने प्रक्रिया चुकली अमळनेर प्रतिनिधी : जानेवारी महिन्यात १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघालेले होते ...
-
पोशिंदा ऑरगॅनिक पुणे ही कंपनी आपल्याला दर्जेदार ऑरगॅनिक खते उपलब्ध करून देते तेही अगदी योग्य दरात शेतकरी हित जोपसणारी कंपनी म्हणून पोशिंदा ...
-
तरूण गर्जना रिपोट अमळनेर : शहरातील गांधलीपुरा भागात किरकोळ कारणावरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना घडली होती. दोन्ही गटा...
-
जळगाव जिल्हा भरारी पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी,कृष...
-
चोपडा प्रतिनिधी : सज्जनांचे रक्षण करण्याऐवजी चोरांना चोरी करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांचा सरदार बनलेल्या पीएसआय प्रल्हाद पिरोजी मांटे याच्य...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा