Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २६ जुलै, २०२१

भोई समाजाचे कुलदैवत चौधरामाता मंदिर बांधकाम पुर्णत्वाकडे अपूर्ण असलेल्या बांधकामासाठी समाज बांधवाना मदतीचे आवाहन..!



शिरपूर (प्रतिनिधी) उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील होळनांथे येथील भोई समाजाचे कुलदैवत अर्थात चौधरा माता मंदिर हे मोठ्या हिंमतीने समाज बांधवांच्या मदतीवर उभे राहत आहे. हे मंदिर म्हणजे या तालुक्यात व परिसरात भोई समाज बांधवांकडून उभे केलेले भव्य मंदिर व सभागृह निर्माण होईल असा संकल्प तालुक्यातील भोई समाजाने केला आहे.आई चौधरा मातेचे जुने स्थान हे पूर्वी अजिंतेसिम येथे होते ते आता नवे स्थान हे होळनांथे या गावात स्थानांपन्न होणार आहे. 

नव्या स्थानावर ग्रहण करण्यासाठी ऑगस्ट महिन्यातील १६ ते २० या दरम्यान करण्याचे नियोजन समाजातर्फे करण्याचे ठरले आहे. या मंदिराला उभे करण्यासाठी परिसरातील समाज बांधवांनी खुप कष्ट घेतलेले आहे आणि ही एक भव्य वास्तू मंदिराच्या रुपाने समोर येताना दिसते आहे.होळनाथे गावात भोई समाजाचे कुल दैवत चौधराआई माता मंदिराचे काम हे आतापर्यंत शेवटच्या टप्प्यात असून समाजातील दानशुर व्यक्तींनी सढळहस्ते मदत केलेली आहे.भोई समाज बांधवांची अनेक वर्षांपासून आपल्या शिरपूर तालुक्यात कुलदैवताचे मंदिर व्हावे अशी इच्छा होती. 

ती ईच्छा मातेच्या कृपेने पुर्णत्वास येत असून सदर मंदिराचा अपुर्ण असलेल्या उभारणीसाठी समाजातील व्यक्तींनी सढळहस्ते समाजातील दानशुर, भाविक, समाजसेवींना आवाहन करण्यात येते की, आपण सदर मंदिराचा अपूर्ण असलेल्या उभारणीसाठी सढळ हस्ते मदत करावी । त्यासाठी तरुण गर्जना परिवार व परिसरातील समस्त भोई समाज बांधव आपल्याला मदतीचे आवाहन करत आहे. आपल्याला मदत करावयाची असल्यास सोबत समाजातील कार्यकारणीतील सदस्यांचे मोबाईल नंबर वर संपर्क साधावा. 

सुरेश शामराव ढोले 8390780338
डिंगाबर एकनाथ ढोले 9422591396
रुपचंद साबुलाल ढोले  9623188787
जयपाल सुकलाल ढोले  8390355731

अकाऊंट नं.: 013360100005910 (IFSC Code: IBKL0483DND) धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि.धुळे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध