Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३१ जुलै, २०२१
हे दोन नेते कानात एकमेकांना काय बोलले असतील याची चर्चा आता सोशल मीडियावर सुरू
कोल्हापूर प्रतिनिधी:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर पूरपरिस्थितीचा पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. दोघांनीही कोल्हापुरातील विविध पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली.जिथं मुख्यमंत्री येणार होते तिथेच फडणवीस देखील पोहोचले. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते दोघेही एकाच ठिकाणी शाहुपुरीत भेटले. दरम्यान एकेकाळी राजकीय मित्र असलेले आजी-माजी मुख्यमंत्री एकत्र आले आणि त्यांच्यात संवादही झाला.
आता एकेकाळचे जीवलग राजकीय मित्र, पण आता वेगवेगळ्या राजकीय दिशेला असलेल्या आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या कानात काही तरी कुजबुज केली. झालं मग नेटकऱ्यांनी हाच व्हिडीओ व्हायरल करत याचे अनेक मिम्स सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.हे दोन नेते कानात एकमेकांना काय बोलले असतील याची चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
कोल्हापुरात दोन्ही नेत्यांचा दौरा आहे हे समजल्यानंतर याची मोठी उत्सुकता कोल्हापूरकरांना लागली होती. त्यामुळे बघ्यांची,माध्यमांची,पोलीस यंत्रणा आणि प्रशासकीय अधिकारी यांची गर्दी होती. दोन्ही नेते एकमेकांसमोर आले,परंतु गर्दीत आवाज ऐकू येत नसल्याने कानात काहीतरी सांगितले. यावर नेटकऱ्यांनी लगेच 'सर्कीट हाऊसवर तांबडा पांढरा मस्त आहे, ताव मारून जा',घेऊया का शपथ पहाटे पहाटे! असे मिम्स बनवले.
त्याचं झालं असं,उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस वेगवेगळ्या ठिकाणी होते.याची माहिती उद्धव ठाकरेंना मिळताच देवेंद्र फडणवीसांना तिकडेच थांबण्याचा निरोप पाठवला गेला.शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला निरोप पोहोचवला.“वेगवेगळी पाहणी करण्यापेक्षा एकत्र पाहणी करूया” असा फोन उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांना गेला.त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांची विनंती मान्य करून शाहुपुरीतच थांबण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर एकत्र पाहणी झाली.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्...
-
नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून श्री जितेंद्र दामोदर पगारे (सर) नंदुरबार जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ पुरस्कार...
-
मुदतीत बांधणाऱ्यांना वाढीव अनुदान द्या तालुका काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन अमळनेर : तालुक्यातील अनेक शासकीय घरकुल लाभार्थ्यांन...
-
शेवग्याचा मेव्हणा व खवशी च्या आरोपींना अटक अमळनेर प्रतिनिधी : धुळे जिल्हयातील फागणे येथील आपल्या शालकाची विम्याची रक्कम हडप करण्यासाठी शे...
-
तरूण गर्जना रिपोट :_ २९ मे ते २ जून सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीने बाहेर (खुल्या आकाशाखाली) जाऊ नये कारण हवामान विभाग...
-
अमळनेर:- अक्कलपाडा धरणातून पिण्यासाठी पाझरा नदीत आवर्तन सोडण्याची मागणी परिसरातील सरपंच उपसरपंच व लोकप्रतिनिधी यांनी केली आहे . यावर्षी ...
-
अमळनेर : आई वडील ऊस तोडायला गेल्याने आसऱ्यासाठी ज्याच्याकडे ठेवले त्या चुलत मामानेच परित्यक्ता भाचीला तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत...
-
प्रचिती इंटरनॅशनल स्कूल कावठे (साक्री) येथील तीन शिक्षकांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य इंग्लिश मीडियम...
-
सद्या राज्यात रासायनिक खतांच्या बेसुमार वापराने जमिनींची प्रत बिघडत चालली आहे. सेंद्रिय खतांचा वापर त्यासाठी वाढवताना पोशिंदाचा ऑरगॅनिक खताच...
-
जानेवारीत १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघाल्याने प्रक्रिया चुकली अमळनेर प्रतिनिधी : जानेवारी महिन्यात १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघालेले होते ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा