Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३१ जुलै, २०२१
माहिती अधिकाराचा दणका, ग्रामपंचायत असली ग्रामसेवकास 15 हजार रुपयांचा दंड
शिरपूर - शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत असली या गावाच्या तत्कालीन ग्रामसेविकास माहिती अधिकारा अंतर्गत मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केली म्हणून राज्य माहिती आयोगाने 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शिरपूर तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते महेंद्र प्रेमसिंग जाधव (संपादक निर्भीड विचार) यांनी सन 2017-18 मधील ग्रामपंचायत शिंगावे व असली या गावातील महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत झालेला जवळपास 1 करोड रुपयांचा भ्रष्टाचार उघड केला होता.
सदर प्रकरणात अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात व दोन सरपंच यांच्याविरोधात गुन्हे दाखल असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सदर प्रकरणाशी संबंधित माहितीची मागणी सन 2017 मध्ये करण्यात आली होती. मात्र तत्कालीन ग्रामसेविका श्रीमती वैशाली निकुंबे यांनी हेतू पुरस्कृत सदरची माहिती देण्यास टाळाटाळ केली होती. यासंदर्भात झालेल्या प्रथम अपील व आयोगाकडील अपिलाच्या वारंवार देण्यात आलेल्या नोटीसी वर कोणताही खुलासा न करता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली होती.
यानंतर 2021 मध्ये आयोगाने दिलेल्या अंतिम नोटिशीला उत्तर देताना त्यांनी मला दप्तर न मिळाल्यामुळे माहिती देता आली नाही असा खुलासा सादर केला होता. मात्र आयोगाने सदरच्या खुलासा अमान्य करून आपण माहिती अधिकार अधिनियमा च्या भंग केला असून अर्जदारास माहिती देण्यास सतत 3 वर्षे टाळाटाळ केली .आहे शिवाय आयोगाची देखील दिशाभूल केली आहे.
आणि अर्जदारास माहिती देण्यास हेतुपुरस्सर टाळाटाळ केली आहे असे दिसत असल्याने आयोगाने त्यांना पंधरा हजार रुपये दंडाची शास्त्तीची कारवाई केली आहे. आणि विस्तार अधिकारी ग्रामपंचायत यांना त्यांच्या वेतनातून 2 समान हप्त्यात सदरची रक्कम वसूल करून माहिती आयोगास कळवण्या याबाबत अवगत केले आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्...
-
नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून श्री जितेंद्र दामोदर पगारे (सर) नंदुरबार जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ पुरस्कार...
-
मुदतीत बांधणाऱ्यांना वाढीव अनुदान द्या तालुका काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन अमळनेर : तालुक्यातील अनेक शासकीय घरकुल लाभार्थ्यांन...
-
शेवग्याचा मेव्हणा व खवशी च्या आरोपींना अटक अमळनेर प्रतिनिधी : धुळे जिल्हयातील फागणे येथील आपल्या शालकाची विम्याची रक्कम हडप करण्यासाठी शे...
-
तरूण गर्जना रिपोट :_ २९ मे ते २ जून सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीने बाहेर (खुल्या आकाशाखाली) जाऊ नये कारण हवामान विभाग...
-
अमळनेर:- अक्कलपाडा धरणातून पिण्यासाठी पाझरा नदीत आवर्तन सोडण्याची मागणी परिसरातील सरपंच उपसरपंच व लोकप्रतिनिधी यांनी केली आहे . यावर्षी ...
-
अमळनेर : आई वडील ऊस तोडायला गेल्याने आसऱ्यासाठी ज्याच्याकडे ठेवले त्या चुलत मामानेच परित्यक्ता भाचीला तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत...
-
प्रचिती इंटरनॅशनल स्कूल कावठे (साक्री) येथील तीन शिक्षकांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य इंग्लिश मीडियम...
-
सद्या राज्यात रासायनिक खतांच्या बेसुमार वापराने जमिनींची प्रत बिघडत चालली आहे. सेंद्रिय खतांचा वापर त्यासाठी वाढवताना पोशिंदाचा ऑरगॅनिक खताच...
-
जानेवारीत १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघाल्याने प्रक्रिया चुकली अमळनेर प्रतिनिधी : जानेवारी महिन्यात १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघालेले होते ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा