Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३० जुलै, २०२१
Home
/
Unlabelled
/
तरडी शिरपूर येथे बायो सीएनजी प्रकल्प - हत्ती गवतापासून होणार सीएनजी निर्मिती - जातोडा येथे मार्गदर्शन शिबीर संपन्न..!
तरडी शिरपूर येथे बायो सीएनजी प्रकल्प - हत्ती गवतापासून होणार सीएनजी निर्मिती - जातोडा येथे मार्गदर्शन शिबीर संपन्न..!
शिरपूर प्रतिनिधी :सध्या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे.गॅस सिलेंडरचे भाव देखील गगनाला भिडले आहेत व दिवसेंदिवस इंधनाच्या किमती मध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे.
या वाढत्या महागाईला आळा बसावा म्हणून भारत सरकारने पर्यायी इंधन म्हणून प्रत्येक तालुक्यात बायो सीएनजी प्रकल्प, बायो पीएनजी प्रकल्प, तसेच सेंद्रिय खत निर्मितीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात स्थानिक क्षेत्रावर रोजगार निर्मिती होणार आहे.
भारत सरकार द्वारे संपूर्ण देशात एमसीएल MCL (मिरा क्लीन फ्युअल लिमिटेड) या मुख्य कंपनी मार्फत प्रत्येक तालुक्यात CNG प्रकल्प उभारण्यात येत आहे.
आपल्या शिरपूर तालुक्यात तरडी या गावी MCL कंपनीच्या सहकार्याने सिंधुबाई शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड तर्फे 10 एकर जागा घेऊन एनए देखील करण्यात आले आहे व लवकरच तालुक्यातून 10 हजार सभासदांची नोंदणी झाल्यानंतर येत्या जानेवारी अखेर Bio CNG, Bio PNG व सेंद्रिय खत उत्पादन कंपनी सुरू होणार आहे.
या प्रकल्पामध्ये भविष्यात शिरपूर तालुक्यात २००० कुशल अकुशल कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना आपल्या तालुक्यातच रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
◆हत्ती गवतापासून बायो सीएनजी, बायो पीएनजी निर्मितीप्रक्रिया
हत्ती गवताला गिनिगोल,नेपिअर गवत देखील संबोधले जाते.आतापर्यंत शेतकरी या गवताचा उपयोग चारा म्हणून करत होते. मात्र या गवतापासून आता सीएनजी, पीएनजी व सेंद्रिय खत निर्मिती होणार असून प्रत्येक तालुक्यात याचे मुख्य ऑफिस असणार आहे व गावागावात डीलर नेमले जाणार आहेत.
यासाठी शेतकऱ्यांना सभासद फी म्हणून २५० व शेअर फी २५० असे एकूण ५०० रुपये भरल्यानंतर त्यांचा अर्ज भरला जाईल व शेतकऱ्याला मोफत हत्ती गवत लागवडी साठी दिले जाईल. साधारण तीन महिन्यात हे पीक काढणीयोग्य झाल्यानंतर सदर कंपनी स्वतःचे वाहन पाठवून ते कापणी करून विकत घेणार आहेत.
◆ हत्ती गवताची वाढ व शेतकऱ्यांचे उत्पन्न
हत्ती गवत (गिनिगोल) साधारण दोन महिन्यात १५ ते २० फुटांपर्यंत वाढते तीन महिन्यात एकदा कापणी केली तरी साधारणपणे वर्षातून चार वेळा कापणी होणार आहे. एक एकर मध्ये किमान ८० ते १०० टन उत्पादन शेतकऱ्याला यातून मिळणार आहे. या गवताला प्रती टन भाव हा एक हजार रुपये असणार आहे. विशेष म्हणजे सदर गवताचे वजन हे स्वतःच्या गावातच होणार असून वजनामध्ये होणाऱ्या नफेखोरीला देखील चाप बसणार आहे. तसेच उत्पादित माल गेल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यावर आठवड्या भराच्या आत पैसे जमा होणार आहेत.
हत्ती गवताच्या लागवडीसाठी शिरपूर तालुक्यातून 50 गाव निवडण्यात आली आहेत. प्रत्येक गावातून 200 सभासद या प्रमाणे 10 हजार सभासदांचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे पैकी 7 हजार सभासदांची नोंदणी झाली आहे आता सभासद नोंदणी ही अंतिम टप्प्यात आहे.
जातोडा येथे डी.एच.आर ग्राम संकलन केंद्राचे उदघाटन सिंधुबाई शेतकरी उत्पादक कंपनीचे संस्थापक अध्यक्ष दीपक पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी निवृत्त कृषी अधिकारी देसले साहेब व बोरसे साहेब यांनी मार्गदर्शन केले. प्रस्तावना निलेश देसले सर, सूत्रसंचालन आर. सी. सिसोदे सर व आभार प्रदर्शन बोरगाव- जातोडा डी.एच.आर. ग्राम संकलन केंद्राचे प्रमुख बी. डी. सिसोदिया सर यांनी केले.
बोरगावचे उपसरपंच तथा सरपंच महासंघ शिरपूर तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया यांचा हस्ते कंपनीचे संस्थापक अध्यक्ष दीपक पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रा.राकेश चौधरी, सुहास पाटील सर, जातोड्याचे सरपंच रावसाहेब धनगर, उपसरपंच दर्यावसिंग राजपूत, माजी सरपंच भटेसिंग राजपूत, उदेसिंग भटेसिंग राजपूत, जयसिंग राणा, डी जे राजपूत, सोसायटी चेअरमन बकता तात्या, मा चेअरमन सुभाषसिंग राजपूत, रवा काका, भंबु आबा, रविंद्र राजपूत, भाजपा तालुका चिटणीस रावसाहेब हिम्मतसिंग राजपूत, कोमलसिंग राजपूत, रामसिंग राजपूत, जितेंद्र राजपूत, बोरगाव चे पोलिस पाटील मनोहर पाटील, माजी सरपंच रघुनाथ कोळी, मा उपसरपंच नानेसिंग राजपूत, सरकार राजपूत, दीपक राजपूत, गुलझारसिंग भाऊसाहेब, धुडकू भिल व जातोडा-बोरगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्...
-
नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून श्री जितेंद्र दामोदर पगारे (सर) नंदुरबार जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ पुरस्कार...
-
मुदतीत बांधणाऱ्यांना वाढीव अनुदान द्या तालुका काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन अमळनेर : तालुक्यातील अनेक शासकीय घरकुल लाभार्थ्यांन...
-
शेवग्याचा मेव्हणा व खवशी च्या आरोपींना अटक अमळनेर प्रतिनिधी : धुळे जिल्हयातील फागणे येथील आपल्या शालकाची विम्याची रक्कम हडप करण्यासाठी शे...
-
तरूण गर्जना रिपोट :_ २९ मे ते २ जून सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीने बाहेर (खुल्या आकाशाखाली) जाऊ नये कारण हवामान विभाग...
-
अमळनेर:- अक्कलपाडा धरणातून पिण्यासाठी पाझरा नदीत आवर्तन सोडण्याची मागणी परिसरातील सरपंच उपसरपंच व लोकप्रतिनिधी यांनी केली आहे . यावर्षी ...
-
प्रचिती इंटरनॅशनल स्कूल कावठे (साक्री) येथील तीन शिक्षकांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य इंग्लिश मीडियम...
-
अमळनेर : आई वडील ऊस तोडायला गेल्याने आसऱ्यासाठी ज्याच्याकडे ठेवले त्या चुलत मामानेच परित्यक्ता भाचीला तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत...
-
सद्या राज्यात रासायनिक खतांच्या बेसुमार वापराने जमिनींची प्रत बिघडत चालली आहे. सेंद्रिय खतांचा वापर त्यासाठी वाढवताना पोशिंदाचा ऑरगॅनिक खताच...
-
जानेवारीत १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघाल्याने प्रक्रिया चुकली अमळनेर प्रतिनिधी : जानेवारी महिन्यात १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघालेले होते ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा