Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २५ जुलै, २०२१
Home
/
Unlabelled
/
माजी मंत्री आ.अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून,द्वेता गारमेंट येथे मुकेशभाई पटेल चॅरिटेबल ट्रस्ट संचालित भूपेशभाई ग्रीन आर्मी च्या वतीने वृक्षारोपण
माजी मंत्री आ.अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून,द्वेता गारमेंट येथे मुकेशभाई पटेल चॅरिटेबल ट्रस्ट संचालित भूपेशभाई ग्रीन आर्मी च्या वतीने वृक्षारोपण
शिरपूर प्रतिनिधी:तालुक्यातील तांडे येथील द्वेता गारमेंटस येथे मुकेशभाई पटेल चॅरिटेबल ट्रस्ट संचालित भूपेशभाई ग्रीन आर्मी च्या वतीने गुरुपौर्णिमा व वन संवर्धन दिनाच्या पार्श्वभूमीवर वड,औदुंबर,पिंपळ या त्रिवेणी वृक्षाचे गुरुमंत्र व गायत्री मंत्रांच्या उदघोषात रोपण करण्यात आले
यावेळी नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल, सौ. कृतीबेन भूपेशभाई पटेल, श्रीमती रिमा तपनभाई पटेल, कु. द्वेता भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते विधिवत पूजा करून द्वेता गारमेंट्स परिसरात शिरपूर तालुक्यातील महिला भगिनी साठी सुरू करण्यात आलेल्या प्रशिक्षण केंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला अनेक महिला भगिनी,शिलाई मशीन प्रशिक्षणार्थी महिला भगिनी,भूपेशभाई पटेल ग्रीन आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सौ.पौर्णिमा पाठक यांनी प्रास्ताविकात वृक्षारोपण मोहिमेबाबत माहिती दिली.
पर्यावरणाला पूरक व आवश्यक असे वड, उंबर, बेल, करंज, सिशु, कौठ, जांभूळ, बांबू, चिंच अशा विविध झाडांची लागवड करण्यात आली. गेल्या वर्षी देखील भूपेशभाई ग्रीन आर्मी च्या वतीने शिरपूर शहरात व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली होती. सदर वृक्षारोपण मोहीम गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सुरू असून असंख्य वृक्षांची नुसतीच लागवड केली नसून तर सर्वत्र वृक्ष संवर्धन देखील करण्यात आले आहे.
त्रिवेणी बाबत शिरपूरच्या नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल म्हणतात, त्रिवेणी हा वड, औदुंबर, पिंपळ या तिन झाडांचा संगम आहे. त्रिवेणी आपल्याला संस्कृतीशी जोडण्याचा संदेश देते. त्रिवेणी आपल्याला अध्यात्माशी जोडते. त्रिवेणी ही येणाऱ्या पिढ्यासाठी एक वरदान आहे. जिथे त्रिवेणी आहे तिथे प्रत्येक क्षणी सकारात्मक उर्जाचा प्रवाह असतो. जोपर्यंत पृथ्वीवरील नैसर्गिक समतोल राखला जाईल, तोपर्यंत मानवी समाज आणि जीवनाचा अखंड प्रवाह वाहत जाईल. माणूस जसा निसर्गाच्या कामांमध्ये हस्तक्षेप करतो तसा तो स्वतःच्या नाशाचा पाया घालतो. निसर्गाकडून आपण नेहमी घेत आलो आहे आता वेळ आली आहे निसर्गाला कृतज्ञतेने परत करण्याची. म्हणून वृक्षारोपण काळाची गरज आहे असे मत शिरपूरच्या नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल यांनी व्यक्त केले.
यावेळी गायत्री परिवाराचे सत्यपाल महाराज, सौ. नीलिमाताई, स्वीय सहाय्यक सुनील जैन, गजानन पाटील, भूपेशभाई पटेल ग्रीन आर्मी चे कार्यकर्ते धीरज माळी, बापू महाजन, प्रशांत पवार, बाबाजी महाजन, ललित फिरके,रवी पाटील,अनुप बाविस्कर, स्वप्नील बावस्कर, सनी बावस्कर, सचिन सिसोदिया, मनोज पाटील,अरुण पटेल, अशोक बाफना,गिरीष सनेर, दीपक बडगुजर, जितू शेटे,जय माळी, प्रणव पाटील,सुमित पाटील, निलेश पाटील, हंसराज चौधरी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
दिंडोरी प्रतिनिधी :- दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील प्रा.उपकेंद्रात जन आरोग्य समितीची बैठक नुकतीच पार पडली. पार पड...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा