Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, २४ जुलै, २०२१
Home
/
Unlabelled
/
वर्डी ता. चोपडा येथे विमान दुर्घटना स्थळी माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या सर्वांचा शिरपूर विमानतळावर भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन ऋणनिर्देश
वर्डी ता. चोपडा येथे विमान दुर्घटना स्थळी माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या सर्वांचा शिरपूर विमानतळावर भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन ऋणनिर्देश
शिरपूर प्रतिनिधी: वर्डी ता. चोपडा येथे विमान दुर्घटना स्थळी माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या सर्वांचा शिरपूर विमानतळावर भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन ऋणनिर्देश करण्यात आला.
एस. व्ही. के. एम. संचालित एन. एम. आय. एम. एस. च्या अकॅडमी ऑफ एव्हिएशन शिरपूर येथील प्रशिक्षण केंद्राचे दोन आसनी विमान वर्डी ता. चोपडा येथे अपघातग्रस्त झाले होते. या दुर्घटनेत एक वैमानिक जागीच ठार झाला होता तर प्रशिक्षणार्थी महिला वैमानिक गंभीर जखमी झाली होती. यावेळी तातडीने मदत कार्य करणाऱ्या चोपडा तालुक्यातील डॉक्टर टीम व सर्व बांधव यांचा शिरपूर विमानतळावर
एस. व्ही. के. एम. संस्थेचे सह अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते संस्था व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, संस्था मुख्य लेखापाल व प्रशासक राहुल दंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भेटवस्तू देऊन शनिवारी दि. २४/७/२०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता ऋणनिर्देश करण्यात आला.
यावेळी प्रास्ताविक संस्था मुख्य लेखापाल व प्रशासक राहुल दंदे यांनी केले. चोपडा येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी यावेळी मनोगतात सांगितले की, पटेल परिवार सर्व क्षेत्रात तत्परतेने व तळमळीने काम करताना दिसून येतात, ही सर्वांसाठी फारच अभिमानाची बाब आहे. विमान दुर्घटना स्थळी वर्डी, विष्णापूर, चोपडा येथील अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्याचबरोबर पटेल परिवारा मार्फत शिरपूरच्या टीमने देखील तातडीने मदत पोहचवली. मदतीसाठी जे सर्व पुढे सरसावले, त्या सर्वांचे मोठे योगदान आहे.
सर्वांनी मनापासून मदत केली. युवा वर्ग, डॉक्टर्स पत्रकार बांधव, सर्व क्षेत्रातील मान्यवर यांनी मदत केली. दुर्घटनेत आपण एक पायलट गमावले याचे दुःख आहे तर एक पायलट भगिनी अंशिका गुर्जर ही वाचली याचा आनंद आहे. पटेल परिवाराच्या टीम वर्कचे काम अतुलनीय व आदर्श आहे. विमलबाई भिल या आजींनी अंगावरील साडी फाडून झोळी साठी दिली, काहींनी बांबू तोडून झोळी बनवली, ४ कि.मी. अंतर पायी चालत झोळीतून अंबुलन्स पर्यंत जखमीला नेले, सर्वांचे मनापासून आभार.
यावेळी राजगोपाल भंडारी म्हणाले, माणुसकीची भावना व परोपकाराची भावना जपून विमान दुर्घटना स्थळी सर्वांनी केलेले काम हे ईश्वरीय कार्य आहे. आपण सर्वांनी
आयुष्यभर आमच्या लक्षात राहील असे काम केले आहे. सदैव आपले उपकार राहतील. आपण शिरपूर येथे आलात, आमच्या कडून व संस्थेकडून सत्कार स्वीकार केला त्याबद्दल आभार मानतो.
यावेळी भूपेशभाई पटेल, राजगोपाल भंडारी, राहुल दंदे, राजेंद्र पाटील (राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष चोपडा), डॉ. राहुल पाटील, डॉ. मनोज पाटील, डॉ. नदीम शेख, डॉ. गुरुप्रसाद वाघ, डॉ. कांतीलाल पाटील, वर्डी ता. चोपडा पोलीस पाटील पद्माकर नाथ, उपसरपंच बारकू पाटील, विमलबाई हिरमल भिल, रमेश बारेला, सुमारिया बारेला, राजाराम बारेला, बिशन बारेला, नंदलाल भिल, साईराम बारेला, एकनाथ बारेला, लखन गुजर, किरण बडगुजर, धनंजय पाटील, मुकेश गुजर, मंगेश धनगर, दीपक शिवाजी पाटील, उमाकांत धनगर, अविनाश धनगर, अजय कानडे, प्रफुल्ल जोशी, मुबारक तडवी, राज पाटील, अमोल धनगर, मॉन्टी शिंदे, रामलाल पावरा, सुरज पाटील, किशोर पाटील, समाधान पाटील, आदीकराव धनगर, 108 वरील तौसिफ खान पठाण, वर्डी व विष्णापूर ता. चोपडा येथील ग्रामस्थ, शिरपूर विमानतळाचे एअर कमांडर हितेश पटेल, अमित जांगीड (ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर), विशाल शिरसाठ, श्रीकांत भट उपस्थित होते. या सर्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला. बारकू लक्ष्मण पाटील यांनीही मनोगत व्यक्त करुन दुर्घटनेबाबत व मदत कार्याबद्दल माहिती दिली.
शिरपूर प्रशिक्षण केंद्राचे हे दोन आसनी छोटे विमान नियमितपणे हवाई प्रशिक्षण सुरु असताना पर्वतरांगेतील दाट झाडीमध्ये अचानक दि. 16 जुलै 2021 रोजी दुपारच्या वेळी कोसळले होते. यावेळी अपघात स्थळी खोल भागात परिसरातील आदिवासी बांधव विमान कोसळल्याच्या आवाजाने त्या दिशेने गेले व त्यांनी मदतकार्य सुरू केले.
यात पायलट जागीच ठार झाले होते. टेकनम दोन सीटर पी 2008 जेसी क्रमांक व्हीटी-बीआरपी विमान हे अंदाजे 300 तास हवाई सफर केले होते. या घटनेतील मयत पायलट कॅप्टन नूरुल अमीन यांना एकूण 500 तास विमान चालविण्याचा अनुभव होता. यातील प्रशिक्षणार्थी पायलट अंशिका गुर्जर हिला 113 तासांचा 58 तास सोलो फ्लाइंगसह अनुभव होता. सदर एअरक्राफ्ट कंपनीचे नाव टेकनम TECNAM असून विमानाची नोंदणी व्हीटी-बीआरपी (सिंगल इंजिन),एअर क्राफ्ट नाव - टेकनम पी 2008 जेसी, उत्पादन वर्ष - 2019 आहे.
दुर्दैवाने या अपघातात कॅप्टन नुरुलमीन (बंगळुरू) हा आपल्या प्राणास मुकला असून प्रशिक्षणार्थी अंशिका गुजर (खरगोण, म. प्र.) या जखमी पायलटला मुंबई येथे नानावटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार सुरु आहेत.
माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी तातडीने मदत कार्य करण्यासाठी प्रयत्न केले.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : आई वडील ऊस तोडायला गेल्याने आसऱ्यासाठी ज्याच्याकडे ठेवले त्या चुलत मामानेच परित्यक्ता भाचीला तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत...
-
अमळनेर:- अक्कलपाडा धरणातून पिण्यासाठी पाझरा नदीत आवर्तन सोडण्याची मागणी परिसरातील सरपंच उपसरपंच व लोकप्रतिनिधी यांनी केली आहे . यावर्षी ...
-
नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून श्री जितेंद्र दामोदर पगारे (सर) नंदुरबार जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ पुरस्कार...
-
सद्या राज्यात रासायनिक खतांच्या बेसुमार वापराने जमिनींची प्रत बिघडत चालली आहे. सेंद्रिय खतांचा वापर त्यासाठी वाढवताना पोशिंदाचा ऑरगॅनिक खताच...
-
पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्...
-
मुदतीत बांधणाऱ्यांना वाढीव अनुदान द्या तालुका काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन अमळनेर : तालुक्यातील अनेक शासकीय घरकुल लाभार्थ्यांन...
-
शेवग्याचा मेव्हणा व खवशी च्या आरोपींना अटक अमळनेर प्रतिनिधी : धुळे जिल्हयातील फागणे येथील आपल्या शालकाची विम्याची रक्कम हडप करण्यासाठी शे...
-
तरूण गर्जना रिपोट :_ २९ मे ते २ जून सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीने बाहेर (खुल्या आकाशाखाली) जाऊ नये कारण हवामान विभाग...
-
बातमी छापली नाही म्हणून पत्रकारांवर होणारे हल्ले ही नित्याचीच बाब झाली असून सांगली जिल्ह्यात महिनाभरात दोन पत्रकारांवर हल्ले झाले असून या घट...
-
प्रचिती इंटरनॅशनल स्कूल कावठे (साक्री) येथील तीन शिक्षकांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य इंग्लिश मीडियम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा