Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना
कोरोना काळात जीवाची पर्वा न करता योगदान देणाऱ्या राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खालील प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.१५ नोव्हेंबर रोजी पासून आझाद मैदान मुंबई येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
मागण्या
१) राज्य शासनाने आखलेल्या सामान किमान कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरीव स्वरूपा ची मानधनवाढ देण्याचे घोषित केले आहे. घोषणेप्रमाणे सामान किमान कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा निर्णय विनाविलंब घेण्यात यावा.
२)अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे दररोजचे काम हे साडेचार तासांऐवजी ८ तास मोजून ( पूर्णवेळ काम देऊन ) त्यांना शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि भत्ते लागू करण्यात यावेत.
३)हरियाणा, केरळ, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गोवा आदी. राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देखील मानधनवाढ लागू करण्यात यावी.
४) दि. २१ जून २०१९ रोजी मा. मंत्री, महिला व बाल विकास यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीनंतर दरमहा पेन्शन देण्याचा निर्णय तात्काळ घेण्यात यावा.
५) अंगणवाडी केंद्राचे काम करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना शासनामार्फत मोबाईल फोन हे सन २०१९ मध्ये पुरविण्यात आलेले आहेत. पुरविण्यात आलेले मोबाईल हे निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना मोबाईलमध्ये वारंवार बिघाड होणे, मोबाईल हँग होणे अशा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परिणामी अंगणवाडी सेविकांना त्यांच्या कामात अडथळा येत असून अंगणवाडी केंद्राचे काम सुरळीत होण्यासाठी अंगणवाडी सेविकांना अद्ययावत आणि जास्त क्षमता असलेले व चांगल्या दर्जाचे नवीन मोबाईल फोन पुरविण्यात यावेत, तसेच खराब मोबाईल शासनाने दुरुस्त करून द्यावे, सेविकांवर मोबाईल दुरुस्त करण्याची जबाबदारी लादण्यात येऊ नये.
६) कोरोना काळात शासनाने केलेल्या आव्हानाला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सकारात्मक प्रतिसात देत कोव्हीड १९ संबंधित सर्व कामे तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी ची कामे जीव धोक्यात घालून केलेली आहेत. आजही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोव्हीड सेंटरवर सकाळी ७ ते सायंकाळी ५ कालावधीत ड्युटी करावी लागत आहे. परंतु सदर कामाचा मोबदला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आलेला नाही. म्हणून अंगणवाडी कर्मचायांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे कोव्हीड - १९ तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेअंतर्गत केलेल्या कामाचा दरमहा १००० इतका मोबदला / प्रोत्साहन भत्ता शासन निर्णयाप्रमाणे देण्यात यावा.
७) दि. ३० एप्रिल २०१४ च्या शासन आदेशाप्रमाणे मृत्यु पावलेल्या, सेवा समाप्त झालेल्या, राजीनामा दिलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती लाभ देण्याची अनेक प्रकरणे हि ३ ते ४ वर्षांपासून प्रलंबित आहेत. हि प्रकरणे प्राधान्याने मंजूर करत अशा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या लाभाची रक्कम हि तात्काळ देण्यात यावी.
८) मध्यवर्ती शासनाच्या दि. ०५ जुलै २०१८ रोजीच्या आदेशानुसार प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अंगणवाडी कार्यकर्ती विमा योजना या योजनांचे लाभ अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी सेविका यांना लागु करण्यात यावेत.
९)राज्यात बहुसंख्य अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांची पदे हि रिक्त आहेत. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांची पदे तात्काळ भरण्यात यावीत.
१०) दि. ९ ऑक्टोबर १९९३ च्या शासकीय आदेशानुसार अतिदुर्गम व आदिवासी प्रकल्पात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी सेविकांना जून २०१७ पासून अतिरिक्त प्रोत्साहन भत्ता पूर्वलक्षी प्रभावाने लागू करून, थकीत रक्कम तात्काळ देण्यात यावी.
११)अंगणवाडी केंद्राच्या कामाची माहिती पोषण ट्रॅकर अप्लिकेशनमध्ये इंग्रजीत भरावी लागत आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करता पोषण ट्रॅकर अप्लिकेशनमध्ये माहिती भरण्याची भाषा हि इंग्रजी ऐवजी मराठी करण्यात यावी.
१२)राज्यातील मिनी अंगणवाडी केंद्रांचे नियमित अंगणवाडी केंद्रांमध्ये रूपांतर करून मिनी अंगणवाडी सेविकांना नियमित सेविकांप्रमाणे मानधन, सुट्या तसेच मदतनीस ची नियुक्ती देण्यात यावी.
१३) मदतनीस पात्र नसलेल्या गावात मिनी अंगणवाडी सेविकेला अंगणवाडी सेविकेच्या रिक्त जागेवर थेट नियुक्ती देण्यात यावी.
१४) अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या पदांवर अनुकंपा तत्वावर पात्र वारसांना सेवेत थेट समाविष्ट करून घेण्यात यावे.
१५) अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना आजारपणाची राजा देण्यात यावी.
१६) अंगणवाडी कर्मचाऱ्यांना २०२० व २०२१ वर्षाचे गणवेशाचे पैसे हे तात्काळ मिळावेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणारी गणवेशाची रक्कम हि २ साड्या घेणे या प्रमाणे तुटपुंजी आहे. कारण या साड्यांसोबत कर्मचाऱ्यांना इतरही बाबींवर खर्च करावा लागत आहे, जसे ( परकर, ब्लाउज, बिडिंग आणि फॉल ) म्हणून आम्ही मागणी करीत आहोत कि, गणवेशाच्या रकमेमध्ये वाढ करत ती प्रत्येकी रुपये २०००/- इतकी करण्यात यावी.
१७)पोषण ट्रॅकर अप्लिकेशन मध्ये केलेल्या एंट्री नंतर कारणास्तव त्यात सुधारणा करता येत नाही. माहिती मध्ये पुन्हा दुरुस्ती करता यावी यासाठी, पोषण ट्रॅकर अप्लिकेशन मध्ये, माहिती पुन्हा एडिट करण्यासंबंधी आवश्यक सुधारणा करण्यात यावी.
१८)अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी १ महिना उन्हाळी सुट्टी देण्यात यावी.
१९) अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीच्या रकमेत अंगणवाडी सेविका ३ लाख, मदतनीस २ लाख, आणि मिनी सेविका २ लाख रुपये वाढ करण्यात यावी.
१९)सन २००८ साली सेवासमाप्ती समितीची स्थापना झाली. तेंव्हापासून सेवा समाप्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीचा लाभ लागू करण्यात यावा.
२०)५० वर्षे वरील वयोगटातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोविड - १९ कामाची सक्ती करण्यात येऊ नये.
२१)सेवा ज्येष्ठता व शैक्षणिक पात्रतेप्रमाणे मानधन वाढ करण्यात यावी.
२२) सण २०२१ ची १६ दिवसांची हक्काची उन्हाळी सुट्टी कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर मिळावी.
२३) मुख्यसेवीका पदाची भरती हि १० वर्षानंतर होत आहे, त्यामुळे त्यात वयोमर्यादेची सूट देण्यात यावी.
यासह अन्य मागण्यांबाबत संघटनेने सततपणे पाठपुरावा केला आहे.परंतु शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे.परिणामी त्यांच्यात प्रचंड नाराजी पसरली आहे.
म्हणूनच मागण्या मान्य होईपर्यंत दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी पासून मंत्रालयासमोर आझाद मैदान, मुंबई येथे संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख प्रतिनिधींचे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील, युवराज पी. बैसाणे, दत्ता जगताप, सुमंत कदम, सुधीर परमेश्वर,
अमोल बैसाणे यांनी कळविले आहे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रेयसीला शेवटचा व्हिडीओ कॉल -बनावट नावाने लॉज मध्ये राहिला अमळनेर : गुजरात मधील अहमदाबाद मधील पोस्को चा गुन्हा दाखल असलेल्या एका आरो...
-
अमळनेर : तालुक्यातील जवखेडा येथे मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वीज चमकल्याने घोड्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सायंकाळी अ...
-
मोटरसायकल वर दूध वाहून नेणाऱ्या जानव्याच्या भाग्यश्रीचे अपघाती निधन अमळनेर : वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून पित्यासाठी ‛भाग्यश्री’ ठर...
-
अमळनेर : भुसावळ सुरत पॅसेंजर मध्ये अवघ्या एक महिन्याच्या बाळाला टाकून आई वडील अमळनेर स्थानकावर उतरून गेल्याची घटना ९ रोजी रात्री घडली. ...
-
शिरपूर प्रतिनिधी : परिस्थिती सोबत संघर्ष करीत पत्रकार गणेश जैनांनी पाहिलेले स्वप्न त्यांची लेक तनिष्का जैन हिने दहावीच्या गुणवत्ता यादीत यत...
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर कृषि उत्पन्न बाजार समिती येथून १९ मे २०२५ रोजी सकाळी ८ वाजता सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, जिल्हास्तरीय तिरंगा यात्रा आय...
-
साक्री तालुक्याचे प्रगतीशील शेतकरी श्री विशाल दिलीप खैरनार.में वाय.जी.मोरे सिड्स अँड पेस्टीसाईड चे संचालक यांच्या मौजे विठाई येथील शेतात कलश...
-
नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून श्री जितेंद्र दामोदर पगारे (सर) नंदुरबार जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ पुरस्कार...
-
पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्...
-
नाशिक प्रतिनिधी :नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या डिके नगर पोलीस चौकीत रात्री अकरा वाजेच्या सुमारास ४ ते ५ पोलीस कर्मचारी ओली पार्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा