Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१



शिवशाहीर या ५ अक्षरांमध्येच जो काही अर्थ आहे तीच खर तर बाबासाहेबांची ओळख..आज १०० वर्षी या तरुण व्यक्तीच आपल्यात नसणं, हे खूप वेदनादायक आहे.
सळसळता उत्साह तुम्हा आम्हाला लाजवेल असा होता,आणि आपल्याला देखील त्या वयात मिळावा हि अपेक्षा..छत्रपती शिवाजी महाराज,स्वराज्य आणि शिवचरित्र या विषयात झपाटलेपणा काय असतो ते बाबासाहेबांकडून शिकाव.
शिवरायांबद्दलची प्रत्येक गोष्ट ज्या सफाईदारपणे लोकांपर्यत पोहचवली ज्यातून अनेक व्यक्ती प्रोत्साहित होऊन महाराजांवर संशोधन करु लागल्या. प्रत्येक घरात शिवराय पोहचवण्याच अतुलनीय कार्य बाबासाहेबांनी करुन ठेवल अहे त्याला आपल्याला पुढे घेऊन जायच आहे.हा वारसा पुढे चालू ठेवायचा आहे.

शिवाजी राजे जेव्हा भेटतील तेव्हा ते ही कदाचित तुम्हाला आलिंगन देतील आणि मराठी रक्त धगधगत ठेवल त्याबद्दल तुमचे कौतुक सुध्दा करतील.या देशात आज खूप कमी पाय आहेत ज्याच्या पायावर डोक ठेवावसं मनापासून वाटत त्यातले बाबासाहेब एक. आज ते आपल्या जरी नसले तरी त्याची वाणी,त्याचे लेख ,त्याचे विचार आपण जपूया.या अशा अवलियाला बघत बघत जगता आल त्या बद्दल देवाचे आभार मानूया बाबासाहेब तुम्हाला विनम्र आदरांजली..

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध