Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना आज दि.१५ नोव्हेंबरपासून संघटनेच्या प्रमुख प्रतिनिधींचे आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन




महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना आज दि.१५ नोव्हेंबरपासून संघटनेच्या प्रमुख प्रतिनिधींचे आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन कोरोना काळात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका,मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना समान किमान कार्यक्रमानुसार भरीव मानधनवाढ देण्यासह,सेवा समाप्तीनंतर दरमहा पेंशन लागू करा,माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या कामाचा मोबदला मिळावा,पोषण ट्रॅकर मध्ये भरण्याची भाषा मराठी करावी,पोषण ट्रॅकर मधील तांत्रिक दोष दूर करण्यात यावेत,अंगणवाडी केंद्रांच्या कामकाजासाठी नवीन व अद्ययावत मोबाईल फोन पुरविण्यात यावेत,यासह अन्य प्रलंबित मागण्या सोडविण्यात याव्यात.
          
या मागणीसाठी आज आझाद मैदान मुंबई येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांचनी कोविडसंबंधी  नियमावली आणि जमावबंदी आदेशाचे पालन करत संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली सरचिटणीस शुभांगीताई पालशेतकर, कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील,युवराज बैसाने,दत्ता जगताप, तेजश्री जाधव,सुधीर परमेश्वर या प्रतिनिधींनी धरणे आंदोलनात सहभाग घेतला.

हमारी युनियन, हमारी ताकत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध