Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, २० नोव्हेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
कायदेशिर सर्व परवानग्या असल्याचे सांगणा-या भामट्यांना जोराचा दणका 12 कोटीचा दंड.. बातमीमागील सत्य..!
कायदेशिर सर्व परवानग्या असल्याचे सांगणा-या भामट्यांना जोराचा दणका 12 कोटीचा दंड.. बातमीमागील सत्य..!
शिंदखेडा प्रतिनिधी : तालुक्यातील स्टोन क्रेशर धारकांनी वाजवी पेक्षा जास्तीचे उत्खनन केल्याने मा.तहसिलदार सुनिल सौंदाणे यांनी तालुक्यातील ७ स्टोन क्रेशर धारकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,चार पाच दिवसांपूर्वीच दिलेल्या रॉयल्टी पेक्षा पाच ब्रास जास्त मुरूम वाहतूक करणाया वाहनांवर कायदेशिर गुन्हा शिंदखेडा तहसिलदार यांनी नरडाणा पोलीस स्टेशनला नोंद केलेला आहे.
यापूर्वी खदाण धारकांना खदाणीच्या मोजमापी बाबत ई.टी.एस.तपासणीचे आदेश देण्यात आलेले होते. त्याचे अनुषंगाने वाजवी पेक्षा जास्त उत्खनन केलेल्या सात खदाण धारकांवर १२ कोटी रुपयांचा दंड प्रशासनाने ठोठावला. सदर दंडाची रक्कम भरण्याची मुदत संपल्याने खदाण चालकांचे बँकामधील खातेही गोठवण्यात आले आहे.
यात कारवाई झालेले शिंदखेडा तालुक्यातील शिव स्टोन क्रेशर वायपूर, गणपती स्टोन क्रेशर वायपूर, प्रथमेश स्टोन क्रेशर वायपूर, होम स्टोन क्रेशर चांदगड, माऊली स्टोन क्रेशर खलाणे, पार्थ स्टोन क्रेशर दत्त वायपूर, नवकार स्टोन क्रेशर षापळे, यांचा समावेश आहे.
शिंदखेडा तालुक्यात अवैध पद्धतीने अवैध गौण खनिज वाहतूक शुरू असून या गौण खनिज माफियांविरुद्ध सततचा पाठपुरावा तरुण गर्जना या वृत्तपत्राने केल्याने येथील तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी कारवाई करत शिंदखेडा तालुक्यातील एकूण सात स्टोन क्रेशर धारकांनी त्यांना दिलेल्या रॉयल्टी पेक्षा खदानी मध्ये अधिक उत्खनन केल्याने या सातही स्टोन क्रेशर चालकांना पाचपट दंडासह १२ कोटी ५८ लाख रुपयांची रक्कम भरण्याचे आदेश केले आहे दंडाची रक्कम भरेपर्यंत क्रेशर मशिन सील ठोकण्यात आले आहे. शासकीय रॉयल्टी पेक्षा ५ ब्रास अतिरिक्त मुरूम भरल्याने पाच दिवसांपूर्वी शिंदखेडा तालुक्याच्या तहसिलदारांनी माजी पंचायत समिती सदस्य लोटन देसले यांच्याविरुद्ध नरडाणा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.
मशिनद्वारे केले खदानी चे मोजमाप शिंदखेडा तालुक्यातील दत्त यायपूर चांदगड खलाणे व बाभळे येथे स्टोन क्रेशर आहेत याच गावांमधून शिंदखेडा तालुकासह जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या गावांमध्ये बांधकाम व विविध क मांसाठी लागणारी खडी जाते या विविध स्टोन क्रेशर चालकांनी भरलेल्या रकमेपेक्षा कितीतरी पट अधिक उत्खनन केले आहे त्यांच्यावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सर्व संबंधित सर्व खदान यांचे मोजमाप ईटीएस मशीनद्वारे करण्यात आले.
त्यात संबंधित स्टोन क्रेशर मालकांनी भरलेल्या रॉयल्टी पेक्षा खदानी मधून अधिक उत्पन्न केल्याचे निदर्शनास आले यासंदर्भात सर्व मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या मुदतही देण्यात आली तरीदेखील मुदतीत रक्कम शासनाकडे जमा न केल्याने रॉयल्टी रकमेच्या पाचपट अधिक दंडाची रक्कम ठोठावण्यात आली आहे संबंधित क्रेशर मालकांना दंडाची रक्कम भरण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. मा.तहसिलदार सुनिल सौंदाणे यांच्या कामगिरीचे चौफेर कौतुक होत आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : भुसावळ सुरत पॅसेंजर मध्ये अवघ्या एक महिन्याच्या बाळाला टाकून आई वडील अमळनेर स्थानकावर उतरून गेल्याची घटना ९ रोजी रात्री घडली. ...
-
साक्री तालुक्याचे प्रगतीशील शेतकरी श्री विशाल दिलीप खैरनार.में वाय.जी.मोरे सिड्स अँड पेस्टीसाईड चे संचालक यांच्या मौजे विठाई येथील शेतात कलश...
-
प्रेयसीला शेवटचा व्हिडीओ कॉल -बनावट नावाने लॉज मध्ये राहिला अमळनेर : गुजरात मधील अहमदाबाद मधील पोस्को चा गुन्हा दाखल असलेल्या एका आरो...
-
अमळनेर : तालुक्यातील जवखेडा येथे मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वीज चमकल्याने घोड्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सायंकाळी अ...
-
मोटरसायकल वर दूध वाहून नेणाऱ्या जानव्याच्या भाग्यश्रीचे अपघाती निधन अमळनेर : वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून पित्यासाठी ‛भाग्यश्री’ ठर...
-
शिरपूर प्रतिनिधी : परिस्थिती सोबत संघर्ष करीत पत्रकार गणेश जैनांनी पाहिलेले स्वप्न त्यांची लेक तनिष्का जैन हिने दहावीच्या गुणवत्ता यादीत यत...
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर कृषि उत्पन्न बाजार समिती येथून १९ मे २०२५ रोजी सकाळी ८ वाजता सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, जिल्हास्तरीय तिरंगा यात्रा आय...
-
नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून श्री जितेंद्र दामोदर पगारे (सर) नंदुरबार जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ पुरस्कार...
-
अमळनेर:- अक्कलपाडा धरणातून पिण्यासाठी पाझरा नदीत आवर्तन सोडण्याची मागणी परिसरातील सरपंच उपसरपंच व लोकप्रतिनिधी यांनी केली आहे . यावर्षी ...
-
पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा