Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

शिदखेडा तालुक्यातील गौण खनिज उत्खनन वाहतूक व खदाण मालक व चालक यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई होणे गरजेचे..! कितीही दुर पळून गेलेत तरी ' कानुन के हाथ कितने लंबे है.ये नही भुलना चाहिये,सदर माल कुठून घेतला, कुठे जात होता ?



तरुण गर्जना वृत्तसेवा

शिंदखेडा प्रतिनिधी : बऱ्याच दिवसांपासून अवैधरित्या व बेकायदेशिरपणे गौण खनिज वाहतूक व उत्खनन बाबत तरुण गर्जना वृत्तपत्रातून सतत पाठपुरावा सुरु असल्याने शिंदखेडा येथील तहसिलदार श्री.सुनिल सौंदाणे यांनी अत्यंत शिताफीणे सापळा रचुन कायदेशिर कारवाई करण्याचे सुरु केले आहे चार पाच दिवसांपूर्वी खडी व मुरुम भरलेले हायवा वाहने व ट्रॅक्टर जप्त केली आहेत.अशातच मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दिलेल्या शासकीय रॉयल्टीपेक्षा जादा ब्रास मुरूम खडी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कायदेशिर कारवाई करण्यासाठी गेले असता सदर वाहन चालकांनी शाब्दीक वाद घालून मा.तहसिलदार सौदाणे यांना अरेरावी करुन अपशब्द वापरले तसेच त्यांचा हात धरून रस्त्याच्या कडेला ओढून नेले.
मा.तहसिलदार यांना,घेराव टाकून शासकिय कामकाजात अडथळा निर्माण केला.व गाडी चालक गाड्या घेवून फरार झाले आहेत.याबाबत मा तहसिलदार यांनी लेखी फिर्याद नरडाना पोलीसांना दिली असताना देखील वाहन जप्त का झाले नाही ?

यात एम .एच .३ ९ एडी ० ९ ०४ ,एम .एच .३ ९ एडी -८१११ व एम .एच . ४८ टी - ९ ३३६ या डंपरचे चालक व मालक मुरुम वाहतूकदार लोटन देविदास देसले रा.माळीच तालुका शिंदखेडा जि.धुळे व त्यांचे ४ अज्ञात साथीदार हे वाहने घेवून पसार झाले आहेत.याबाबत सविस्तर तपास स.पो.नि.ठाकरे यांच्या आदेशान्वये पो.स.ई.हेमंत राऊत यांना देण्यात आला आहे.

वरील घडलेल्या प्रकाराबाबत परिसरातील जनतेने तिव्र संताप व्यक्त केलेला आहे.या गुंड प्रवृत्तीच्या गौण खनिज उत्खनन वाहतूक व खदाण मालक व चालक यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई वरदहस्तक यांच्यापर्यंत पोहचणे आवश्यक आहे . त्यासाठी वाहनांच्या नंबरावरुन वाहन मालकांची नावे आर.टी.ओ.विभागाकडून तत्काळ मिळू शकतात तर ठिकठिकाणी असलेल्या टोल प्लाझाच्या सी.सी.टि.व्ही फुटेज वरुन वाहनांचा मार्गक्रम काढता येवू शकतो.त्यामुळे हे कितीही दुर पळून गेलेत तरी ' कानुन के हाथ कितने लंबे है.ये नही भुलना चाहिये,सदर माल कुठून घेतला , कुठे जात होता ? या सर्वांचा तपास केल्यास म्होरक्यास जेरबंद करणे पोलीसांना सोपे जाईल अशी अपेक्षा परिसरातील सर्वसामान्य जनतेकडून होत आहे.

पोलीस तपास अधिकाऱ्यांनी देखील आपले काम चोख बजावल्यास जनतेच्या कौतुकास पात्र ठरतील ( वाचा सविस्तर पुढील अंकात)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध