Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१९

दारू बंदी साठी गावोगावी... शिरपूर तालुक्यातील जापोरा...- गितांजली कोळी




शिरपूर (प्रतिनिधी)
दि.19/10/2019 रोजी खुप दिवसांपासुन निमंत्रण असलेल्या दारू बंदी च्या जनजागृती साठी शिरपूर जवळील पंचवीस किलो मीटर अंतरावर असलेल्या जापोरा गावाला जाण्यासाठी माझा वाहन नसतांना मांजरोद फाट्यापासून जापोरा गावापर्यंत तीन कि.मी. पिरपिर  पावसात पायी पायी आनंदी उत्साही उमेदीचा  नागमोडी वळणावर चा निसर्ग रम्य प्रवास झाला.


खुप दिवसांपासून महीलाभगीनींचा जापोरा गावाला दारू बंदी साठी या असा महीलांचा फोन वरून निरोप होता.

धुळ्याहून सकाळी अकरा वाजता शिरपूर ला  निघाले.दिड तासाने शिरपूर ला पोहचून इतर कामे उरकून दोन वाजता थाळनेर गावी पोहोचले तेथून पुन्हा बसने मांजरोद गावापुढील जापोरा फाटा येथे सोडले.माझ्यासोबत अनेक विद्यार्थी ही जापोरा फाट्यावरून पायी जाण्यासाठी निघाले त्यांच्या सोबत मी ही पायी पायी निघाले.जापोरा या गावांसाठी दिवसातून दोन तीन च बस शिरपूर येथून येतात येरवी मोटरसायकल नसलेल्या ंना पायीच प्रवास करावा लागतो.

तीन कि.मी.अतंर चालून विद्यार्थ्यांकडून माहिती काढली व गावातील महिला भगींनीजवळ पोहोचले.
संपूर्ण प्रवासात पाऊसाची रिपरिप सुरू च होती.



तशाच वातावरणात एका आदीवासी आजीच्या ओसरीवर आमची छोटीशी दारू बंदी ची गावासाठी तळमळ असलेल्या महीलांची बैठक पार पडली.
एक आजी तर रडायला लागली.तिचा मुलगा दारू पिऊन मेला होता.दुसर्या मावशीचा मुलगा दारू पिऊन रोज घरात भांडणे मारझोड करतो असे सांगतांना अतिशय संतापलेल्या महीला दारू बंदी गावात व्हायलाच पाहिजे म्हणून मला नवी उमेद देत होत्या.
अनेक जणीं अनेक कटू अनुभव सांगत होत्या.खुप खुप दुःख होत होते त्यांच्या व्यथा ऐकतांना पण मी दिलेल्या हिम्मत तीने सावरल्या दारू बंदी च्या लढाई साठी सिध्द होऊ म्हणाल्या.पुढच्या वेळी येणार तेव्हा गावातील भरपूर महीला आमच्या सोबत राहतील असा विश्वास जातोडा गावातील महिला भगीनींनी दिला.
आनंदी अश्रूंनी पुन्हा या असा निरोप दिला.महीलांच्या दारू पायी दुःख भोगणार्या माय माऊलींच्या वेदनेंची विश्वासाची शिदोरी घेऊन परतले.नव्या उमेदीने दारू विरूद्ध लढण्यासाठी.....

सौ गीतांजली कोळी 
संपूर्ण महाराष्ट्र दारूबंदी महीला युवा मोर्चा धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध