Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २१ ऑक्टोबर, २०१९

शिरपूर मतदार संघात जिह्यातील सर्वात जास्त मतदान


शिरपूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसाठी शिरपूर मतदार संघात आज दि.२१ ऑक्टोबर सकाळी ७ वाजेपासून मोठ्या उत्साहात सर्वच्या सर्व मतदान केंद्रावर सुरळीत मतदानाला सुरु आहे. कुठे ही अनुचित प्रकार घडला नाही.शांततेत मतदान सुरू आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत शिरपूर विधानसभा मतदार संघात जिल्ह्यातील सर्वात जास्त ५२.०८ % मतदान झाले आहे शिरपूरचे विद्यमान आमदार व भाजपा महायुतीचे उमेदवार काशिराम पावरा यांनी सुळे येथील मतदान केंद्रावर मतदान केले तर बोराडी येथील मतदान केंद्रावर भाजपा तालुका अध्यक्ष राहुल रंधे यांनी मतदान केले भुपेशभाई पटेल,चिंतनभाई पटेल ,केतकीबेन मुकेशभाई पटेल ,तपनभाई पटेल, कक्कुबेन पटेल, हेमंताबेन पटेल यांनी सकाळी ११ वाजेदरम्यान तर दुपारी ४ च्या दरम्यान माजी शिक्षणमंत्री अमरिश भाई पटेल यांनी किसान विद्या प्रसारक मंडळाच्या मुख्यालयातील शंकर पांडू माळी विद्यालय येथील २३७ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर मतदान केले. दिवस भरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.विधानसभा मतदार संघात प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस दलाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध