Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १७ ऑक्टोबर, २०१९

लाखादूर येथील भोई/ढिवर समाज महिला नेत्या राधाताई मेश्राम यांचा ना. डॉ. फुकें च्या हस्ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश..





प्रतिनिधी :साकोली15ऑक्टोबर:सातत्याने महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठविणार्या महिला भोई/ढिवर नेत्या श्रीमती राधाताई मेश्राम यांनी  भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार ना. डॉ परिणय फुके यांच्या हस्ते भाजप पक्षाचा शेलाधारण करून भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला. श्रीमती मेश्राम यांचा पक्षप्रवेश कुडेगाव येथील जाहीर सभेत झाला. यावेळी आमदार बाळा काशिवार, डॉ दिलीप शिवरकर, प्रकाश लोणारे,अमोल बावणे उपस्थित होते

ना. डॉ. फुके यांच्या प्रामाणिक प्रयत्ननांमधून या क्षेत्रातील शेतकरी, मच्छीमार वर्ग व कामगारांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.या क्षेत्राचा उल्लेखनीय विकास घडवून 

आणला.शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांना निवारण्यासाठी वेळोवेळी योग्य पाऊल उचलले गेले.या सर्व कामांना लक्षात घेऊन डॉ.फुकें वर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून हा पक्ष प्रवेश करण्यात आला आहे.डॉ.फुके सद्या भंडारा व गोंदीया जिल्ह्याचे पालकमंत्री
आहेत.

ना. डॉ.फुके यांसारख्या विकासकांना उमेदवारी दिल्याने साकोली मतदार क्षेत्राचा सर्वांगीण विकासाला वेग आला असल्याचे निश्चित झाले आहे.लोक ज्या पद्धतीने भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत त्या अनुषंगाने  भाजपाने या राज्यात पुरोगामी प्रगतिशील पंचवार्षिक मुदत दिली असल्याचे लक्षात येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध